मराठमोळ्या सचिन तेंडुलकरचा मोठेपणा…. रस्त्यावरच्या हॉटेलवर घेतला चहा तर काम करणाऱ्या मुलाला टीपसुद्धा दिली, मालकालाही दिले हे स्पेशल गिफ्ट.
मराठमोळ्या सचिन तेंडुलकरचा मोठेपणा…. रस्त्यावरच्या हॉटेलवर घेतला चहा तर काम करणाऱ्या मुलाला टीपसुद्धा दिली, मालकालाही दिले हे स्पेशल गिफ्ट.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेलं नाव. सचिननं 90 चं दशक आणि त्यानंतरची अनेक वर्ष क्रिकेटचं मैदान गाजवलं. त्यानं विक्रमांचे अनेक इमले उभारले. त्याच्या काही विक्रमांच्या अजून जवळपासही कुणी गेलेलं नाही.
आज भारतरत्न सचिन तेंडुलकरचा यांचा साधेपणा आज बेळगाव वासीयांना पाहायला मिळाला. 2013 साली सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतरही सचिनची क्रेझ ही कमी झालेली नाहीये.
सचिन तेंडुलरकर हे गोव्याला मुलगा अर्जुनसोबत निघाले होते. याचदरम्यान त्यांनी बेळगाव येथे एका ठिकाणी रस्त्याकडे असलेल्या एका चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. फौजी चहा असे या चहाच्या टपरीचे नाव आहे. या चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. चहाच्या टपरीचे मालक पिंटू प्रकाश याना यांचा सुखद धक्का बसला.

सचिन तेंडुलकर आणि त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचे यावेळी चहाचे बिल हे 175 रुपये इतके झाले. यावेळी त्यांनी 200 रुपयांची देऊन हे बिल भरले. तसेच 25 रुपये वापस न घेता टीप दिली. इतकेच नव्हे तर या नोटवर त्यांनी सही सुद्धा केली. यानंतर चहा टपरीचे मालक पिंटू प्रकाश सोबत सेल्फीही काढला. यावेळी सचिन तेंडुलकर यांच्या साधेपणाचा अनुभव यावेळी आला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता 9 वर्ष उलटली आहेत. त्यानंतरही त्याची जादू कायम आहे. आजही सचिनला भेटण्याची, त्याला किमान एकदा प्रत्यक्ष पाहण्याची, त्याच्याकडून यशाचा कानमंत्र घेण्याची अनेकांची इच्छा असते.
हेही वाचा: