धक्कदायक..! सचिन तेंडूलकरच्या VVIP सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या जवानाने स्वतः डोक्यात गोळी घालून संपवले आयुष्य, धक्कादायक कारण आहे समोर..!

0
5
धक्कदायक..! सचिन तेंडूलकरच्या VVIP सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या जवानाने स्वतः डोक्यात गोळी घालून संपवले आयुष्य, धक्कादायक कारण आहे समोर..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

SRPF Jawan Prakash Kapade Comiited Sucide:  भारतीय दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या  (SRPF) जवानाने जामनेर शहरातील त्यांच्या वडिलोपार्जित राहत्या घरी आत्महत्या केली. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. प्रकाश कापडे  असे मृत जवानाचे नाव आहे. तो रजेवर मूळ गावी गेला होता.

Sachin Tendulkar Records विश्वचषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडूलकरचाच बोलबाला,पहा यादी.

सचिन तेंडूलकरच्या सुरक्षा ताफ्यात सामील होता प्रकाश कापडे.

प्रकाश कापडे (३९) यांनी आपल्या अधिकृत बंदुकीने मानेवर गोळी झाडली. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले, एक भाऊ आणि इतर सदस्य आहेत. जामनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले की, ही घटना काल (बुधवारी) रात्री दीड वाजता घडली. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यरात्री गोळीबाराचा आवाज ऐकून लोक त्याच्या खोलीकडे धावले आणि त्यांनी पाहिले की प्रकाशरक्ताने माखलेल्या कपड्यात जमिनीवर पडला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर मृताचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मृताच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे.

धक्कदायक..! सचिन तेंडूलकरच्या VVIP सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या जवानाने स्वतः डोक्यात गोळी घालून संपवले आयुष्य, धक्कादायक कारण आहे समोर..!

शिंदे यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘प्राथमिक तपासावरून असे दिसते की, त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी हे पाऊल उचलले आहे, परंतु आम्ही तपासाच्या संपूर्ण तपशीलाची वाट पाहत आहोत.’ कापडे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. जामनेर पोलिसांनी अपघातात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचे कुटुंबीय, सहकारी आणि इतर परिचितांची चौकशी केली जात आहे.

व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी जवान तैनात असल्याने एसआरपीएफही स्वतंत्र तपास करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here