पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट मैदानावर अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू होता. सामना सुरू असताना श्रीलंका क्रिकेट संघासाठी एक दुःखद बातमी समोर आली. या सामन्यादरम्यान श्रीलंकेने त्यांचा सर्वात मोठा फॅन्सला गमावले. श्रीलंकेचा सर्वात जबरा फॅन अंकल पर्सी यांचे निधन झाले.
87 वर्षीय अंकल पर्सी यांचे कोलंबो येथे निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच क्रिकेट प्रेमींमध्ये शोक व्यक्त करण्यास सुरुवात झाली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच प्रत्येक खेळाडू आणि क्रिकेट संघटनेकडून शोक व्यक्त करण्यात आले.
अंकल पर्सी हे श्रीलंका क्रिकेट संघाचे जबरदस्त फॅन होते. गेल्या 40 वर्षापासून ते श्रीलंका संघाचा सामना पाहण्यासाठी प्रत्येक मैदानावर हजर राहून संघाला प्रोत्साहन देत होते. गेल्या बऱ्याच वर्षापासून ते आजारी असल्यामुळे त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना श्रीलंका देशाचा झेंडा घेऊन प्रत्येक मैदानात हजर राहण्यासाठी परवानगी दिली होती. या सोबतच ते प्रत्येक श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडू सोबत बोलत राहायचे. ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची संवाद साधायचे. अंकल पर्सी हे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा देखील जबरदस्त फॅन होते. अंकल आजारी असल्याची बातमी रोहित शर्मा याला कळतच तो मागील आशिया कप स्पर्धेच्या वेळी अंकल यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.
अंकल पर्सी याच्या निधनाची बातमी कळताच श्रीलंकेचा माजी सलामीचा फलंदाज सनथ जयसूर्या याने दुःख व्यक्त केले. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “आम्ही अत्यंत दुःखाने जाहीर करत आहोत की आमचे प्रिय अंकल पर्सी राहिले नाहीत. तुम्ही पहिले सुपरफॅन होतास आणि तुम्ही आमच्या सर्वांसाठी नेहमीच खास राहशील.”
श्रीलंका क्रिकेट संघाची यंदाच्या विश्वचषकात अत्यंत निराशा जनक कामगिरी राहिली आहे. श्रीलंकाने आत्तापर्यंत खेळले गेलेल्या सहा सामन्यात केवळ दोनच सामने जिंकता आले तर इतर चार सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्ताने आपल्या खेळाने सर्वांनाच चकित केले आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान सारख्या मातब्बर संघाचा पराभव करून विश्वचषक स्पर्धेत आता तिसरा उलट फेर झालेला आहे. पुण्याच्या मैदानावर झालेल्या सामन्यात शानदार खेळ करत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. अजमतुल्लाह उमरजई ने शानदार फलंदाजी करत 73 धावांची खेळी केली तर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी 58 याने देखील अर्धशतकी खेळी करत नाबाद परतला.