Viral video: साई सुदर्शनने घेतला एवढा जबरदस्त झेल की, हेनरिक क्लासेन पाहताच राहिला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव करत सामन्यासह मालिका देखील खिश्यात घातली. 3 सामन्याची ही मालिका भारताने 2-1अशी जिंकत एकदिवशीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व मिळवले आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करतांना  भारतीय संघाने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात 8 गड्यांच्या मोबदल्यात 296 धावा केल्या.

Viral video: साई सुदर्शनने घेतला एवढा जबरदस्त झेल की, हेनरिक क्लासेन पाहताच राहिला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

यानंतर क्षेत्ररक्षण करतांना युवा खेळाडू साई सुदर्शनने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवले. त्याने हेनरिक क्लासेनचा उत्कृष्ट झेल घेतला. त्याचा हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत असून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.

 

22 वर्षीय बी साई सुदर्शनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावले आणि जोहान्सबर्गमध्ये 55 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने Gkberha मध्ये 62 धावा केल्या. आता गुरुवारी पार्लमध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने चमत्कार दाखवले. हवेत डायव्हिंग करताना साईने हेन्रिकचा झेल घेतला.

IND vs SA : हवेत डायव्हिंग करत साईने घेतला जबरदस्त झेल.

साई सुदर्शनने डावाच्या ३३व्या षटकात हा शानदार झेल घेतला. आवेश खानचा चेंडू हेनरिक क्लासेनने मिड ऑफच्या दिशेने खेळला. साई सुदर्शनने पुढे सरकत हवेत डाइव्ह मारत हेनरिक क्लासेनचा झेल घेतला. यासह क्लासेनचा २१ धावांचा डाव संपुष्टात आला. त्याने 22 चेंडूत 3 चौकार मारले. यासह दक्षिण आफ्रिकेला १७४ धावांवर पाचवा धक्का बसला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजी करताना टीम इंडियाने 8 गडी गमावून 296 धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि 114 चेंडूत 108 धावा केल्या. टिळक वर्मानेही ७७ चेंडूत ५२ धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगने 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेच्या ब्युरॉन हेंड्रिक्सने 9 षटकांत 63 धावांत 3 बळी घेतले. नांद्रे बर्जरने 2 तर लिझाड विल्यम्स, व्हियान मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *