महेंद्रसिंग धोनी: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचे केवळ देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. त्याच्याबद्दलच्या छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. अशा परिस्थितीत धोनीची पत्नी साक्षीने काही गोष्टी शेअर केल्या आहेत, ज्या जाणून घेतल्यानंतर चाहते पुन्हा एकदा धोनीचे कौतुक करतील. साक्षीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, एवढा मोठा स्टार असूनही धोनीला वडिलांची भीती वाटते.
चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान साक्षीला तिच्या सासू-सासऱ्यांसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. यावर साक्षीने सांगितले की, लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये धोनी बाहेर खेळायला जायचा आणि मी घरीच असायचे. त्यावेळी मला एकटे राहणे थोडे विचित्र वाटायचे पण, सासूबाईंनी मला सगळ्यात जास्त सोयीस्कर केलं. आज आम्ही दोघीही चांगल्या मित्रांसारखे आहोत, जे सर्व काही शेअर करतात.
साक्षी ने केली महेंद्रसिंग धोनीच्या आईची स्तुती.
साक्षीने सासूचे खूप कौतुक करतांना सांगितले की. घरी असे काही घडत नाही जे मी माझ्या सासू-सासऱ्यांसोबत शेअर करत नाही. धोनीचे त्याच्या आईसोबत खूप चांगले संबंध आहेत. या दोघांचे खूप प्रेमळ नाते आहे. जेव्हा तो बाहेरून येतो तेव्हा तो पहिला काम करतो तो त्याच्या आईसोबत थोडा वेळ बसतो. त्याच्याद्वारे आईची प्रत्येक छोटी-मोठी गरज मोठ्या प्रेमाने जपली जाते.
साक्षी म्हणाली, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला घरात कधीही कोणत्याही गोष्टीसाठी अडवले जात नाही. मला जे काही करायचे आहे, ते मोकळेपणाने करण्याचे स्वातंत्र्य आहे.” सासरच्यांबद्दल बोलतांना साक्षी म्हणाली, “ते थोडे कडक आहेत.” जास्त बोलका स्वभाव त्यांचा नाहीये मात्र ते कधीही कशासाठीही थांबत नाही.
धोनीसोबतच्या वडिलांच्या नात्यावर साक्षीने केला खुलासा.
पुढे बोलतांना साक्षी म्हणाली की, “तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण आजही धोनी त्याच्या वडिलांना खूप घाबरतो. आजही त्यांच्याशी बोलण्यापूर्वी दोनदा विचार करतो, कारण माझे सासरे थोडे कडक आहेत. धोनी आजही त्यांचा खूप आदर करतो. माही कोणतेही काम करत असेल तर तो एकदा त्यांच्या वडिलांचा सल्ला नक्की घेतो. बाबा जो काही निर्णय घेतात, तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो,असेही यावेळी साक्षी म्हणाली..
एकंदरीत साक्षीच्या बोलण्यावरून तिच्या आणि परिवारातील प्रेम दिसून येते.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.