‘आता याला इथून थेट घरी पाठवा’ संधी मिळूनही शून्यावर बाद झाल्याने संजू सॅमसनवर भडकले चाहते, T-20 विश्वचषक खेळण्याची संधी गमावली

'आता याला इथून थेट घरी पाठवा' संधी मिळूनही शून्यावर बाद झाल्याने संजू सॅमसनवर भडकले चाहते, T-20 विश्वचषक खेळण्याची संधी गमावली

Sanju Samosn out on Golden Duck:  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल करण्यात आले आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि आवेश खान यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी तिसर्‍या सामन्यात सर्वांच्या नजरा संजू सॅमसनवर लागल्या होत्या कारण सॅमसनला बऱ्याच दिवसांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळाली होती.

या मालिकेसाठी संजू सॅमसनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता, मात्र आतापर्यंत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. तिसर्‍या टी-२० सामन्यात संजूला संधी मिळाली पण संजू या संधीचे सोने करू शकला नाही. यानंतर आता संजू सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.

संजू सॅमसनवर भडकले चाहते.

'आता याला इथून थेट घरी पाठवा' संधी मिळूनही शून्यावर बाद झाल्याने संजू सॅमसनवर भडकले चाहते, T-20 विश्वचषक खेळण्याची संधी गमावली

तिसऱ्या T20 मध्ये जितेश शर्माच्या जागी संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले. या सामन्यात फलंदाजीसाठी आलेला संजू सॅमसन खाते न उघडता बाद झाला. या सामन्यात संजूच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील अशी चाहत्यांना अपेक्षा होती पण संजूने गोल्डन डकवर आऊट होऊन सर्व चाहत्यांची निराशा केली.

यानंतर संजू सॅमसनला सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले. संजू सॅमसनबद्दल सोशल मीडियावर अनेक मजेदार मीम्स देखील शेअर केले जात आहेत.  पाहूया काही भन्नाट मिम्स..

 

 

T20 विश्वचषक 2024 पूर्वी संघाचा शेवटचा सामना.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा सामना हा टीम इंडियाचा टी-20 विश्वचषक 2024 पूर्वीचा शेवटचा सामना आहे. या सामन्यात टीम इंडियाला काही प्रयोग करायचे होते. ज्या खेळाडूंना अद्याप या मालिकेत संधी मिळालेली नाही त्यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला आपल्या तयारीची चाचपणी करायची आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *