DC vs RR: स्फोटक फलंदाज संजू सॅमसन त्याच्या कारकिर्दीत विक्रम रचत आहे. मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने विशेष कामगिरी केली. यशस्वी जैस्वालनंतर संजू तिसरा आला आणि त्याने येताच खळबळ उडवून दिली. यासह त्याने आयपीएलच्या रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. संजूच्या तुफानी खेळीच्या जोरावर त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे..
संजू सॅमसन आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. (sanju Samson hit fastest 200 sixes in ipl history)
संजू सॅमसन आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. संजूने आपल्या 163व्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने 3081 चेंडूत 200 षटकार ठोकले आहेत. तर एमएस धोनीने 3126 चेंडू घेतले आणि रोहित शर्माने 3798 चेंडूत 200 षटकार मारले.
यासह संजू आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा जगातील 10 वा फलंदाज ठरला आहे. या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे. यासह संजूने आयपीएलच्या या मोसमात 400 धावा पूर्ण केल्या आहेत.
आंद्रे रसेल हा सर्वात जलद २०० षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. रसेलने केवळ 1322 चेंडूत 200 षटकार ठोकले. त्याने या बाबतीत ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने 1811 चेंडूत 200 षटकार ठोकले होते.
या यादीत किरॉन पोलार्ड 2055 चेंडूंसह तिसऱ्या स्थानावर तर एबी डिव्हिलियर्स 2790 चेंडूंसह चौथ्या स्थानावर आहे. संजूने आता या एलिट लिस्टमध्ये पाचवे स्थान पटकावले आहे. T20 विश्वचषकापूर्वी संजूच्या झंझावाती फॉर्ममुळे टीम इंडियाचे चाहते खूश झाले आहेत. विश्वचषकात त्याची कामगिरी पाहण्यासारखी असेल.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.