- Advertisement -

संजू सैमसन च्या चुकीमुळे राजस्थान रॉयल संघाला भरावा लागला १२ लाख रुपये दंड

0 0

 

बुधवारी झालेली राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज च्या सामन्यात राजस्थानने ३ रणांनी सामना जिंकला. जे की त्यावेळी महेंद्रसिंग धोनी ख्रिस वर होते तरीही काही करता आले नाही. मात्र या मॅच दरम्यान राजस्थान रॉयल च्या संजू सैमसनकडून चूक झाली. जे की या त्यांच्या नकळत चुकीमुळे संजू ला १२ लाख रुपये दंड भरावा लागला.

ज्यावेळी मॅच होती त्या दिवशी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल ची टीम बनवताना २० ओव्हर चा कोटा ते पूर्ण करू शकले नसल्यामुळे स्लोव ओव्हर च्या रेटमुळे राजस्थान रॉयल संघाच्या कर्णधाराला १२ लाख रुपये दंड सुनावण्यात आला.

 

राजस्थान रॉयल संघाची ही पहिली वेळ असल्यामुळे त्यांच्या कर्णधाराला दंड भरावा लागला मात्र हीच चूक दुसऱ्या वेळी केली तर कर्णधारासोबतच त्यांच्या संघातील खेळाडूंना देखील दंड भरावा लागणार आहे.

आयपीएलने आपल्या बातमी वृत्तपत्रात लिहले की २०२३ च्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल चा हा १७ वा सामना होता जो की चेन्नई मधील एमए चिदंबरम स्टेडियम मध्ये स्लो ओव्हर रेट च्यामुळे राजस्थान च्या संजू ला हा दंड भरावा लागला आहे.

तसे पाहायला गेले तर आयपीएलच्या आचार संहिता नुसार या वर्षीच्या सिजन मधील राजस्थान रॉयल हा पहिला च संघ आहे ज्या संघाच्या कर्णधाराला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.

आतापर्यंत च्या इतिहासात स्लोव ओवर रेट चा दंड भरलेली राजस्थान रॉयल ही दुसरी टीम आहे तर या आधी रॉयल।चॅलेंजर्स बंगलोर या संघाचा कर्णधार फाफ डूप्लेसी ला सुद्धा १२ लाख रुपये दंड भरावा लागला होता. लखनऊ सुपर जायन्ट्स च्या विरोधात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला स्लो ओहर रेट या अपराधामुळे १२ लाख रुपये दंड सोसावा लागला होता.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल चा सामना राहिला धडाकेबाज :-

चेन्नई सुपर किंग्ज चा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्यासाठी निवडले. राजस्थान रॉयल चा जोस बटलर ने आपल्या खेळाच्या जोरावर अर्धशतक ठोकले आणि ८ विकेट्स जाऊन चेन्नई ला १७५ धावांचे लक्ष दिले. चेन्नई सुपर किंग्ज ने २० ओहर मध्ये १७२ रन्स केल्या मात्र त्यांना दिलेले टार्गेट काही पूर्ण करता आले नाही. चेन्नई च्या महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा ने पूर्ण प्रयत्न केला मात्र शेवटी चेन्नई सुपर किंग्ज च्या पदरात अपयश च आले. राजस्थान रॉयल ने ३ रन्स ने सामना आपल्या हातात घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.