IPL RECORDS: IPl मध्ये पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात या खेळाडूने ठोकले होते शतक, पहा कोण आहे भारतीय जिगरबाज खेळाडू?

 IPL RECORDS: IPl मध्ये पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात या खेळाडूने ठोकले होते शतक, पहा कोण आहे भारतीय जिगरबाज खेळाडू?

IPL RECORDS: 2008 पासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिवंगत खेळाडू शेन वॉर्न याने नवख्या खेळाडूंना सोबत घेऊन जिगरबाज कामगिरी करत इंडियन प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर या संघाला कधीच अशी चमकदार कामगिरी करता आली नाही. या संघाने अनेकदा नेतृत्व बदलले, परंतु त्यांना अशी करिष्माई कामगिरी करता आली नाही. आज आपण अशा खेळाडूची माहिती पाहणार आहोत ज्याने, या संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात शतक ठोकले होते.

 IPL RECORDS: या खेळाडूने आयपीएल पदार्पणाच्या सामण्यात ठोकले होते शतक..!

यंदाच्या वर्षात राजस्थान रॉयल्सचा संघ संजू सॅमसन यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरेल. 2021 मध्ये पहिल्यांदा त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा संघ व्यवस्थापनाने दिली होती. टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ करत त्याने पहिल्याच सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी करत सर्वांची मने जिंकली. कर्णधार म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.संजूने अवघ्या 63 चेंडूत 119 धावांची जिगरबाज विस्फोटक खेळी केली होती. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 7 षटकारांची आतिशबाजी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanju V Samson (@imsanjusamson)

सॅमसनच्या नेतृत्वाखाली, राजस्थान संघाने आयपीएल 2022 मोसमत दमदार कामगिरी केली आणि उपविजेतेपद पटकावले. त्या मोसमात सॅमसनने 17 सामन्यांत 28.63 च्या सरासरीने 458 धावा केल्या. तर, 2023 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसनने 14 सामन्यांमध्ये 30.17 च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या. मात्र, राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही.

आयपीएलच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली असता त्याने 152 सामन्यात 3,888 धावा केल्याची नोंद आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या यष्टीरक्षक फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीमध्ये 3 शतके देखील ठोकली आहेत. राजस्थान रॉयल संघाकडून सर्वाधिक धावा काढणारा तो खेळाडू आहे. सर्वात कमी वयामध्ये अर्धशतक ठोकणारा तो खेळाडू आहे.

संजू सॅमसन हा रणजी क्रिकेटमध्ये केरळ संघाचे नेतृत्व करतोय. वयाच्या 17 व्या वर्षी, संजू सॅमसनने 03 नोव्हेंबर 2011 रोजी केरळ रणजी संघाकडून विदर्भाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने अतिशय चांगली कामगिरी केली आणि पुढच्या सत्रात पाच सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले. यानंतर, संजूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

 IPL RECORDS: IPl मध्ये पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात या खेळाडूने ठोकले होते शतक, पहा कोण आहे भारतीय जिगरबाज खेळाडू?

रणजी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणावी तशी संधी मिळाली नाही. आणि जेव्हा या खेळाडूला संधी मिळाली तेव्हा या संधीचे सोने याला करता आले नाही. पुरेशी संधी न मिळाल्याने व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  कामगिरीत सातत्य न राखल्याने त्याला संघबाहेर राहावे लागले. इतर खेळाडूंप्रमाणे त्याला जास्त संधी मिळाल्या असत्या तर कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एक नवा स्टार खेळाडू संजूच्या रूपाने मिळाला असता.

ऋषभ पंत, ईशान किशन आणि आता धुर्व जुरेल यासारखे नवखे खेळाडू भारतीय संघामध्ये  येण्यासाठी स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यामुळे संजू पुढे मोठे आव्हान असणार आहे. जून महिन्यामध्ये पुढचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे. आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करून पुढील विश्वचषकात संघाकडून खेळण्याची त्याचा प्रयत्न असेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *