viral video:राजस्थानच्या कर्णधार संजू सेमसनने घेतला आजपर्यंतचा सर्वांत जबरदस्त झेल पाहून कर्णधार सुद्धा झाला आच्छर्यचकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
viral video:राजस्थानच्या कर्णधार संजू सेमसनने घेतला आजपर्यंतचा सर्वांत जबरदस्त झेल पाहून कर्णधार सुद्धा झाला आच्छर्यचकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
आयपीएल 2023 चा धमाका सध्या सुरु आहे. आज सुपर संडे मध्ये दुपारी राजस्थान रॉयल्स(RR) आणि दिल्ली केपीटल्सचा ( DC)सामना आसामच्या मैदानावर खेळवला जात आहे. सर्वप्रथम फलंदाजी करतांना राजस्थानने ४ गडी गमावून 199 धावा जोडल्या. आणि दिल्लीसमोर 200 धावांचे लक्ष ठेवले आहे.
लक्षाच्या पाठलाग करण्यास उतरलेल्या दिल्लीची सुरवात काही चांगली झाली नाही सलामीवीर पृथ्वी शो आणि मनीष पांडे या दोघानाही ट्रेंड बोल्डने पहिल्याच षटकात बाद केले. राजस्थानच्या गोलंदाजीची सुरवात करण्यास आलेल्या ट्रेंडने दिल्लीच्या फलंदाजांना पहिल्याच षटकात बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला.

यात सर्वप्रथम सलामीवीर पृथ्वी शो ज्या प्रकरे बाद झाला ते पाहून सोशल मिडियावर एकाच खेळाडूची चर्चा झाली तो म्हणजे , राजस्थान रॉयल्सचा कर्णधार ‘संजू सेमसन’. संजूने पृथ्वीचा एवढा जबरदस्त झेल घेतला कि, विरोधी संघाचा कर्णधार डेव्हिड वार्नर सुद्धा चांगलाच चकित झाला.
पहिल्या षटकाचा तिसरा चेंडू ट्रेंड बोल्डने टाकला आणि सलामीवीर पृथ्वीच्या बेटला हलकासा टच होऊनयष्टीमागे गेला. कर्णधार संजू सेमसनने जबरदस्त डाय मारून झेल घेतला. काही क्षणासाठी हा झेल सुटेल असे वाटत असतांना संजूने मात्र आपले संपूर्ण शरीर हवेत उडी घेत बेलंस सांभाळत हा झेल पूर्ण केला.
संजूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी संजूच्या या झेलचे कौतुक करतांना थकत नाहीयेत. याच षटकात ट्रेट बोल्डने पुन्हा मनीष पांडे ला सुद्धा बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला.
पहा संजूचा जबरदस्त झेल..
How about THAT for a start! 🤯
WHAT. A. CATCH from the #RR skipper ⚡️⚡️#DC lose Impact Player Prithvi Shaw and Manish Pandey in the first over!
Follow the match ▶️ https://t.co/FLjLINwRJC#TATAIPL | #RRvDC pic.twitter.com/rpOzCFrWdQ
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
दिल्लीला विजयासाठी 200 धावांची गरज असून त्यांची फलंदाजी पाहता त्यांच्यासाठी हे लक्ष सोपे असणार नाही.