- Advertisement -

आयपीएल 2023: अजिंक्य रहाणेला मागे टाकून संजू सॅमसन च्या नावी नवीन विक्रमाची नोंद,राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू.

0 0

 

 

 

 

आपल्या देशात सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. सध्या आपल्या देशात आयपीएल च्या 16 व्या सिझन ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला येथे खेळताना दिसतात. तरुण पिढी तर आयपीएल आवडीने पाहते.

 

आयपीएल मध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपले नवीन विक्रम बनवतात तर काही खेळाडू जुने रेकॉर्ड मोडण्याचा तयारीत असतात. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने आयपीएल मधील अजिंक्य रहाणे चे रेकॉर्ड मोडले आहेत.

 

 

 

 

आयपीएल च्या 16 व्या सिझन मध्ये राजस्थान रॉयल्सला संघाचा कर्णधार संजू सॅमसन ने किंग पंजाब विरोधात 25 चेंडूत 42 धावा केल्या. या सामन्यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लावला होता. तसेच या सामन्यावेळी संजू सॅमसन ने आपल्या नावी एक नवीन रेकॉर्ड केला आहे. संजू सॅमसन ने अजिंक्य रहाणे चे रेकॉर्ड मोडीत राजस्थान रॉयल्स संघासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

 

 

किंग पंजाब संघाविरुद्ध खेळताना संजू सॅमसन ने 3 धावा काढून अजिंक्य रहाणे चे रेकॉर्ड ब्रेक करून आपल्या नावी नवीन विक्रम नोंदवला आहे. संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडून आतापर्यंत 3096 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन आयपीएल 2013 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग बनला होता. तर राजस्थान रॉयल्सकडून अजिंक्य रहाणेने 3098 धावा केल्या. आयपीएल 2011 ते आयपीएल 2019 पर्यंत तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. तसेच संजू सॅमसन ने राजस्थान रॉयल्स संघासाठी दोन वेळा शतके सुद्धा झळकावली आहेत.

 

 

 

राजस्थान रॉयल्स संघासाठी सर्वाधिक धावा करण्याचा पहिला मान हा संजू सॅमसन कडे गेला आहे शिवाय अजिंक्य रहाणे आणि संजू नंतर शेन वॉटसन हा तिसऱ्या स्थानी आहे. शेन वॉटसन ने राजस्थान रॉयल्स संघासाठी 2474 धावा बनवल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.