क्रीडा

दुसऱ्या एकदिवशिय सामन्यात पुन्हा संजू सॅमसनला काढले संघाबाहेर, बीसीसीआयवर भडकले चाहते, सोशल मिडीयावर #justiceforSanjuSamson ट्रेंड!

दुसऱ्या एकदिवशिय सामन्यात पुन्हा संजू सॅमसनला काढले संघाबाहेर, बीसीसीआयवर भडकले चाहते, सोशल मिडीयावर #justiceforSanjuSamson ट्रेंड!


भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात हॅमिल्टन येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. पावसामुळे टॉसला उशीर झाला. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, संघात दोन बदल करण्यात आले आहेत आणि ते बदल म्हणजे शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहर आणि संजू सॅमसनच्या जागी दीपक हुडा.

मग काय होतं, #SanjuSamson सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलेल्या दोन्ही बदलांबद्दल धवन बोलला होता. संजू सॅमसनला वगळण्याच्या बीसीसीआय आणि व्यवस्थापनाच्या निर्णयावर लोक भरपूर ट्विट आणि कमेंट्स करत आहेत. त्याचबरोबर ते संतापही व्यक्त करत आहेत.

काही चाहते #justiceforSanjuSamson लिहित आहेत तर काही लोक म्हणत आहेत की ते ट्विट करून कंटाळले आहेत. जोपर्यंत तुम्ही संजू सॅमसनला खेळवत नाहीत तोपर्यंत आम्ही ट्वीट करणे सुरुच ठेवू..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने 38 चेंडूत 36 धावा केल्या. एका सामन्यातील कामगिरीच्या जोरावर तुम्ही एखाद्या खेळाडूला संघातून कसे वगळू शकता, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.



हेही वाचा:

भारताचा वेगवान गोलंदाज ‘उमराण मलिक’ लवकरच मोडू शकतो हा मोठा विक्रम, कालच्या सामन्यात टाकलाय एवढा वेगवान चेंडू..

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button