VIRAL VIDEO: आधी ट्रिपल सेंच्युरी नंतर दुहेरी शतक आता आणखी शतक.. वाघासारखा खेळतोय सरफराज खान.. ठोकले आणखी एक शतक..व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
टीम इंडियात प्रवेशासाठी सतत दार ठोठावणारा युवा फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीविरुद्ध आणखी शतक झळकावून खळबळ उडवून दिली. त्याने दिल्लीविरुद्ध अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर 133 चेंडूत आपले 13वे शतक पूर्ण केले. या मोसमातील त्याचे हे तिसरे शतक आहे.
सरफराजने आपले 13 वे शतक ठोकले.
पाचव्या क्रमवारीत फलंदाजीसाठी आलेल्या सरफराजने १४२ चेंडूंत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी खेळली. यासोबतच त्याने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात 500 धावाही पूर्ण केल्या आहेत. गेल्या तीन मोसमात तो 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा करत आहे.

वृत्त लिहिपर्यंत मुंबईने 67 षटकांत 5 गडी गमावून 243 धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच्या बाजूने भूमिका घेतली आहे आणि त्याला टीम इंडियाचा सर्वात मोठा स्पर्धक म्हणून संबोधले आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सरफराजने दिल्लीविरुद्ध गोलंदाजांचा कडवा क्लास लावला. त्याने गोलंदाजांना हवे तसे झोडपून काढले.सरफराजचे रणजी ट्रॉफीतील 50 डावातील हे 13वे शतक आहे. यादरम्यान त्याने एकदा त्रिशतक आणि दोनदा द्विशतक झळकावले आहे. या फॉरमॅटमध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 301, तर नाबाद 275 आणि 226 आहे.
सरफराजने फर्स्ट क्लासमध्ये 43 डावांमध्ये धावा करण्यात महान सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. ब्रॅडमनने 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 43 डावांनंतर 83.63 च्या सरासरीने 2927 धावा केल्या. ब्रॅडमनने 43 डावांनंतर 12 शतके आणि 9 अर्धशतके केली होती. तसेच तो आठ वेळा नाबाद राहिला आहे. तर, सरफराजने 43 डावांमध्ये 10 शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत. तसेच तो सात वेळा नाबाद राहिला आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ..
Hundred and counting! 💯
Yet another impressive knock from Sarfaraz Khan 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/sV1If1IQmA#RanjiTrophy | #DELvMUM | @mastercardindia pic.twitter.com/GIRosM7l14
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 17, 2023
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…