ज्याला वजनदार समजून ‘विराट कोहली’ने टीम इंडियात दिली नव्हती संधी, तोच सर्फराज खान रणजीमध्ये घालतोय धुमाकूळ, एकाच दिवसात ठोकल्या तब्बल एवढ्या धावा…
भारताची देशांतर्गत लीग रणजी ट्रॉफी सुरू झाली आहे. या मोसमाची सुरुवात होताच प्रत्येक सामना रोमांचक होत आहे. दरम्यान, आज म्हणजेच 21 डिसेंबर रोजी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात एलिट ग्रुप बीचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार तन्मय अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे फारसे प्रभावी ठरले नाही.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या सामन्यात रहाणेने द्विशतक ठोकले . तर दुसरीकडे राहणेचा साथीदार 25 वर्षीय युवा फलंदाज सर्फराज खान देखील जबरदस्त लयमध्ये दिसून आला. त्याने नाबाद 126 धावांची खेळी खेळली.
सर्फराज खानने खेळली शानदार शतकी खेळी!
मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी कहर केला आहे. यशस्वी, सूर्या आणि कर्णधार रहाणे यांनी धडाकेबाज खेळी केली. पहिल्या डावात युवा फलंदाज सर्फराज खाननेही आपल्या बॅटने गोलंदाजांना झोडपून काढले. सर्फराजने 161 चेंडूंचा सामना करत 126 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या या उत्कृष्ट खेळीत १५ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबई संघाने 651 धावा जोडल्या आणि डाव घोषित केला.
आज रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने उपाहारापर्यंत 5 गडी गमावून 636 धावा केल्या. आणि त्यानंतर काही षटके खेळून रहाणे ने डाव 651 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात मुंबईच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली तर सूर्याने 90 धावांची जलद खेळी केली.
यशस्वीने 162, रहाणे 204 आणि सर्फराज खान नाबाद 126 धावा करून माघारी परतले. हैदराबादचे गोलंदाज विकेट घेण्यासाठी धडपडताना दिसले. हैदराबादकडून कार्तिक आणि शशांकने प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय तनय त्यागराजनने अजिंक्य रहाणेची महत्त्वाची विकेट घेतली.