टीम इंडियामध्ये जागा न मिळाल्यामुळे या तुफानी फलंदाजाला कोसळले रडू, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्माबद्दल केला मोठा खुलासा..
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 13 जानेवारीलाच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
मात्र, एक झंझावाती फलंदाजही आहे, ज्याला या संघात संधी मिळेल, अशी आशा होती मात्र त्याची घोर निराशा झाली आहे. आम्ही बोलत आहोत रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने खळबळ माजवणाऱ्या सरफराज खानबद्दल.

सर्फराज खानने संघात निवड न झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले असून , तुझे अच्छे दिन येणार आहेत आणि लवकरच येतील, असे निवडकर्त्याने सांगितले होते. मात्र सातत्याने चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान मिळू शकले नाही.
एका मुलाखतीत सरफराज खानने सांगितले की, मुख्य निवडकर्ता चेतन शर्माने त्याला थांबायला सांगितले होते, तुझी वेळ लवकरच येईल. सर्फराज खानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सर्फराज खानच्या जागी सूर्यकुमार यादवचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
सर्फराज खान म्हणाला की, संघाची घोषणा झाल्यानंतर मी एकाकी पडलो आणि मी खूप रडलो, कारण सांगूनही माझी निवड झाली नाही. त्याने सांगितले की, तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये चेतन शर्मालाही भेटला होता. यादरम्यानही चेतन शर्माने निराश होऊ नका, तुम्हाला संधी मिळेल, असे सांगितले होते.
सर्फराज खान म्हणाला की, चेतन शर्मासोबतच्या या भेटीनंतरही त्याने शानदार खेळी खेळली, पण तरीही त्याला संधी मिळाली नाही. सरफराज खानने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 80.47 च्या सरासरीने 3380 धावा केल्या आहेत.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…