100 हून अधिक टॅक्सी चालकांची निर्घुण हत्या करून ‘या’ सिरीयल किलरने अख्या देशभरात दहशत माजवली होती..

100 हून अधिक टॅक्सी चालकांची निर्घुण हत्या करून 'या' सिरीयल किलरने अख्या देशभरात दहशत माजवली होती..

सिरीयल किलर डॉ. देवेंद्र शर्मा:   गुरुग्राम किडनी प्रकरणात सहभागी असलेल्या अलिगड येथील सिरीयल किलर डॉ. देवेंद्र शर्मा याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. डॉ. देवेंद्र शर्मा याच्यावर २००२ ते २००४ दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये १०० हून अधिक टॅक्सी चालकांची निघृत हत्या केल्याचा आरोप आहे.

 

खून केल्यावर डॉ. शर्मा मृतदेहांना अलीगड विभागातील कासगंज जिल्ह्यातील हजारा कालव्यामध्ये नेवून फेकत असे त्याच्या या विकृत प्रक्रतीमुळे त्याची पत्नी आणि मुले २००४ मध्ये त्याला सोडून गेली आहेत. डॉ. देवेंद्र शर्मा याने बिहारमधील सिवान येथून बीएएमएस ची पदवी मिळविली होती.

 

देवाचा अवतार समजल्या जाणाऱ्या डॉक्टर सारख्या व्यवसायात असूनही लोकांना निर्घृणपणे ठार मारणाऱ्या देवेंद्र शर्मा विषयी अधिक धक्कादायक माहिती समोर आली होती. यापूर्वी सिरियल किलर डॉ. देवेंद्र शर्मा याने कबूल केले होते की ५० हत्येनंतर तो केलेल्या खुणांची संख्या मोजणे विसरला होता.

100 हून अधिक टॅक्सी चालकांची निर्घुण हत्या करून 'या' सिरीयल किलरने अख्या देशभरात दहशत माजवली होती..
Serial Killer Dr. Devendra Sharma Story

आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा बळी घेतला असल्याचे त्याने कबूल केले होते. यांपैकी बहुतेकांना त्याने उत्तर प्रदेशच्या कालव्यात फेकून मगरीचे भोजन बनवले होते. देवेंद्र शर्मा नावाचा हा डॉक्टर नुकताच दिल्लीहून पकडला गेला होता. तो बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणात मागील १६ वर्षांपासून शिक्षा भोगत होता.

आता तो पॅरोलवर बाहेर आला होता २० दिवसानंतर त्याला तुरूंगात परत जावे लागणार होते परंतु तो अचानक भूमिगत झाला होता. आता पकडल्या गेल्यावर त्याच्या गुन्ह्यांचे नवनवीन कारनामे उघडकीस येत आहेत.

अलिगडमधील छरा पोलिस स्टेशन परिसरातील पुरैनी गावाचे राहिनाशी ६२ वर्षीय डॉ. देवेंद्र शर्मा याने बिहारमधील सिवान येथून बीएएमएस (आयुर्वेद चिकित्सा व शस्त्रक्रिया) पदवी प्राप्त केली होती. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याने दिल्लीतील एका विधवा महिलेसोबत लग्न केले आणी प्रॉपर्टी डीलिंग चे काम करण्यास सुरवात केली.

सिरीयल किलिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी डॉ देवेंद्र शर्मा जानेवारीमध्ये २० दिवसांच्या पॅरोलवर जयपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता परंतु त्यानंतर कारागृहात न जाता तो पळून गेला आणि भूमिगत झाला होता. तो दिल्लीत लपला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पेवेरिया यांना मिळाल्यानंतर, त्याला दिल्लीच्या बपरोला येथील गल्ली क्रमांक १० मधील एका घरातून अटक करण्यात आली.

 

असा बनला डॉक्टर देवेंद्र शर्मा  सिरीयल किलर.

चौकशीमध्ये देवेंद्र शर्मा याने कबुल केले कि, सिवान येथून बीएएमएस मध्ये पदवी घेतल्यानंतर १९८४ ते १९९५ पर्यंत जयपूरच्या बांदीकुई येथे जनता हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक्सच्या नावाने क्लिनिक सुरू करून तो काम करत होता.

 

१९८२ साली त्याचे लग्न झाले त्याच वेळी १९९४ मध्ये थापर चेंबरमधील भारत फ्युएल कंपनीच्या कार्यालयाने गॅस डीलरशिप देण्याची योजना चालविली होती. देवेंद्र शर्मा याने त्यामध्ये ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती परंतु अचानक कंपनी गायब झाल्याने त्याचे सर्व पैसे बुडाले. १९९५ मध्ये अलिगड येथील छरा येथे त्याने भारत पेट्रोलियमची नकली गॅस एजन्सी सुरू केली होती.

 

याच दरम्यान त्याचा संपर्क दलालपूरवासी राज, उदयवीर आणी वेदवीर यांच्या सोबत आला. एलपीजी सिलिंडर्स घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकांना ठार मारुन त्यांचे ट्रक लुटण्यास सुरवात केली. त्यानंतर नकली गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर काढून घेवून मेरठमध्ये लुटलेल्या ट्रकची विक्री करीत असत. दीड वर्षानंतर बनावट गॅस एजन्सी चालविल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. यानंतर २००१ मध्ये परत त्याने अमरोहामध्ये बनावट गॅस एजन्सी सुरू केली होती.

 

बेकायदेशीर किडनी रॅकेट प्रकरणात शिक्षा झाली

१९९४ मध्ये भारी नुकसान झाल्यानंतर तो जयपूर, बल्लभगढ, गुरुग्राम आणी इतरत्र बेकायदेशीर कार्यरत असलेल्या आंतरराज्य किडनी प्रत्यारोपण टोळीत सामील झाला. २००४ साली गुरुग्राममध्ये डॉ. अमित यांनी चालवलेल्या अनमोल नर्सिंग होममध्ये किडनी रॅकेट प्रकरणात त्याला अटक झाली होती.

 

१९९४ ते २००४ या काळात त्याने बेकायदेशीरपणे केलेल्या १२५ हून अधिक किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी देणाऱ्यांची व्यवस्था केली होती. प्रत्येक किडनी प्रत्यारोपणासाठी त्याला ५ ते ७ लाख रुपये मिळत होते. याच काळामध्ये तो जयपूरला गेला आणी तिथे त्याने २००३ पर्यंत आपले क्लिनिक चालवले.

 

मगरींचे निवास्थान असलेल्या हजारा नदीत मृतदेह फेकून देत असे.

याचदरम्यान देवेंद्र शर्मा याचा संपर्क अलिगढला जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊन ड्रायव्हरचा खून करून टॅक्सी लुटनाऱ्या टोळक्याशी झाला. हे लोक मगरी असलेल्या कासगंजच्या हजारा कालव्यात मृतदेह टाकत असत म्हणूनच आजपर्यंत कोणताही मृतदेह सापडला नाहीये.

100 हून अधिक टॅक्सी चालकांची निर्घुण हत्या करून 'या' सिरीयल किलरने अख्या देशभरात दहशत माजवली होती..

लुटलेली टॅक्सी हे लोक कासगंज आणी मेरठमध्ये २०-२५ हजार रुपयांना विकत असत. शर्माला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या टॅक्सी खरेदी करणाऱ्या सर्व लोकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ५० पेक्षा जास्त खुनांचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे त्याने स्वतः कबूल केले आहे.

 

तसेच १०० हून अधिक टॅक्सी चालकांच्या हत्येमध्ये तो सामील होता. या संदर्भात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणी राजस्थानमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. २००२-२००४ झालेल्या खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती तर सहा प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले होते.


 

.

हेही वाचा:

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *