विश्वचषकात नुकत्याच झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला नमवून एक चांगलाच धक्का दिला आहे. आता त्यात आणखीन एका घटनेची भर पडली आहे. पाकिस्तानी गोलंदाजीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारा शाहीन शहा आफ्रिदी याच्या सासुरवाडी मधून एक वाईट बातमी आली आहे. आफ्रिदीच्या सासुरवाडी मधील एका महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.
शाहीन शहा आफ्रिदी हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याचा जावई आहे. शाहिद आफ्रिदीच्या मोठ्या बहिणीचे दुःखद निधन झाले आहे. ती दीर्घ काळापासून आजारी होती. कराची येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर बऱ्याच दिवसापासून उपचार सुरू होते. डॉक्टरांना तिला वाचवण्यात अपयश आले. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मावळली. सोमवारी शाहिद आफ्रिदीने त्याच्या ट्विटर अकाउंट वरून चाहत्यांना तिच्या बहिणीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. पाकिस्तानमध्ये आफ्रिदीचा परिवार मोठा आहे. त्याला एकूण 11 भावंडे आहेत. त्याला 6 भाऊ तर 5 बहिणी आहेत.
या घटनेमुळे वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदीला चांगलाच मानसिक धक्का बसला. आफ्रिदी सध्या विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला आहे. यंदाच्या विश्वचषकात आफ्रिदीला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला तीन सामन्यात केवळ चारच गडी बात करता आले. त्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक वकार युनिसने तर त्याच्यावर टीकेचे झोड उडवली आहे. त्याने आफ्रिदीला जसप्रीत बुमराह याच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला आहे. वकारच्या मते, आफ्रिदी हा विकेट घेण्यासाठी पाठीमागे धावत आहे तर बुमराह हा लाईन अँड लेन्थवर भर देतोय. आफ्रिदीच्या गोलंदाजीचा स्पीड देखील कमी झाला आहे. 132 ते 134 च्या वेगाने तो गोलंदाजी करतोय.
पाकिस्तानचा पुढचा सामना बेंगलोर येथे 20 ऑक्टोबर रोजी चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी पाकिस्तानच्या संघाला पुरेसा वेळ मिळाला आहे. विश्वचषकातील तीन सामन्यापैकी पाकिस्तानला केवळ दोनच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांच्यासाठी या पुढचा सामना हा खूप महत्त्वाचा असेल. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकून आपल्या विजयाची गाडी रुळावर आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ बंगळूर मध्ये दाखल झाला आहे. संघाने सोमवारी बंगळुरू मध्ये दाखल झाल्यानंतर सराव करण्याऐवजी आराम करण्यावर भर दिला आहे. सर्वच खेळाडूंनी त्यांचा डिनर हॉटेल बाहेर जाऊन केला. पुढच्या सामन्यापूर्वी त्यांनी रिलॅक्स होण्याचा प्रयत्न केला.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी