शाहरुख खान ने दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना दिली जादू की झप्पी! पहा व्हिडिओ

शाहरुख खान

आयपीएल 2024 मधील 16व्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. केकेआरने सुनील नरेंनच्या 39 चेंडूत 85 धावांची तडाखेबाज खेळीच्या जोरावर 20 षटकात 7 बाद 272 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 17.2 षटकात 166 धावांवर सर्व बाद झाला. केकेआरने विजय मिळवल्यानंतर संघमालक शाहरुख खान केवळ आपल्याच संघातील खेळाडूंच्या गळाभेट घेतली नाही तर दिल्ली संघातील सर्व खेळाडूंची तो हस्तांदोलन करत त्यांची गळाभेट घेतली.

शाहरुख खान
शाहरुख खान

शाहरुख ने केकेआरच्या खेळाडूंची भेट घेतल्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंशी देखील भेट घेत त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांना जादू की झप्पी देखील दिली. या भेटीदरम्यानचा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या ट्विटर अकाउंट वर शेअर केलाय.

 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरुख खान दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याचे केस ओढत आहे आणि प्रेमाने गळाभेट घेत आहे. त्यानंतर शाहरुख खान दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याच्याशी बातचीत करताना दिसून येतो आणि त्यानंतर दोघेही गळाभेट घेतात. व्हिडिओमध्ये शाहरुख खान दिल्लीचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ यांची देखील भेट घेतो. शेवटी केकेआरचा मेंटोर गौतम गंभीर यांची देखील गळा भेट घेतो.

शाहरुख खान
शाहरुख खान

आयपीएल 2024 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा आतापर्यंतचा प्रवास खूपच चांगला राहिला आहे. सलग तीन सामने जिंकून सहा गुणांसह ते गुण तालिकेत टॉप वर आहेत तर दिल्ली कॅपिटल्सने चार पैकी एकच सामना जिंकला आहे. गुणतालिकेत हा संघ नव्या स्थानावर आहे.

 

सामन्या विषयी बोलायचं झाले तर, सुनील नरेन याने 39 चेंडूत 85 तर अंगक्रुश रघुवंशी यांनी 27 चेंडू 54 धावांची भर घातली. या दोघांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर केकेआरने 7 बाद 272 धावा काढल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दुसरी धावसंख्या ठरली. दिल्ली कॅपिटल्स कडून कर्णधार ऋषभ पंत यांनी सलग दुसरे अर्धशतक ठोकले तर ट्रिस्टन स्टब्स याने 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघांशिवाय इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ 17.2 षटकात 166 धावांवर बाद झाला.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserve