“योग्य वेळ आल्यावर, मी एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेईन.” बांग्लादेशच्या या दिग्गज कर्णधाराने सांगितला आपल्या निवृत्तीचा प्लॅन..!

“मी एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेईन.” बांग्लादेशच्या या दिग्गज कर्णधाराने सांगितला आपल्या निवृत्तीचा प्लॅन..!


बांगलादेश संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू  आणि कर्णधार शकीब अल हसन (Shakib Al Hassan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. शाकिब अल हसन अद्याप निवृत्ती घेणार नाही. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळल्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याचं त्याने म्हटलं आहे.

शाकिब अल हसन गेल्या 16 वर्षांपासून बांगलादेशकडून क्रिकेट खेळत आहे आणि यादरम्यान त्याने कसोटीमध्ये 66 आंतरराष्ट्रीय सामने, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 240 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 117 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 4454 कसोटी, 7384 एकदिवसीय आणि 2382 टी-20 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने 233 कसोटी, 308 एकदिवसीय आणि 140 टी-20 विकेट्स घेतल्या आहेत.

"मी एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेईन." बांग्लादेशच्या या दिग्गज कर्णधाराने सांगितला आपल्या निवृत्तीचा प्लॅन..!

मी एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेईन – शाकिब अल हसन

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शाकिब अल हसन बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. यादरम्यान त्याने बुधवारी टी-स्पोर्ट्सशी बोलताना एक मोठी घोषणा केली.

शाकिब अल हसन म्हणाला,

माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, कदाचित मी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत एकदिवसीय सामन्यात खेळेन. T20 फॉरमॅटमध्ये मी 2024 च्या T20 विश्वचषकानंतर निवृत्त होऊ शकतो आणि जर आपण कसोटी क्रिकेटबद्दल बोललो तर 2023 च्या विश्वचषकानंतर मी याला अलविदा म्हणू शकतो. कदाचित मी तिन्ही फॉरमॅटमधून एकाच वर्षी निवृत्ती घेईन. पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही पण सध्या हा माझा विचार आहे.

बांग्लादेश

 

या विश्वचषकानंतर मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार होणार नाही. मी एक गोष्ट स्पष्ट करतो. 17 सप्टेंबर रोजी मी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि जेव्हा मी असे केले तेव्हा मला माहित नव्हते की अशी परिस्थिती उद्भवणार आहे. माझ्यासाठी नाही तर संघासाठी मला कर्णधार म्हणून हवा होता आणि त्यामुळेच मी कर्णधारपदासाठी होकार दिल्याचे पपन भाईने सांगितले. कर्णधार नसल्यामुळे माझ्यासाठी गोष्टी सोपे होतात.


हेही वाचा:

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *