Timed out Controversy शकीब अल हसन: विश्वचषक २०२३ चा ३८ वा सामना बांगलादेश आणि श्रीलंका (BAN vs SL) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 279 धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने ७ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. यासह बांगलादेशने विश्वचषकात दुसरा विजय मिळवला. या सामन्यात वादाला तोंड फुटले आणि शेवटी यावर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने मौन तोडून मोठी प्रतिक्रिया दिली.
शाकिब अल हसनने अखेर टाईम आउट वादावर सोडले मौन,दिली प्रतिक्रिया..
आज झालेल्या श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्या सामन्यात बांग्लादेशने विजय मिळवला असला तरीदेखील बांगलादेशचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. हा सामना कोणाला आठवत असो वा नसो. पण बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन त्याच्या या कृत्यामुळे नेहमीच लक्षात राहील. कारण शाकिबने या सामन्यात टाईम आउट नियमाचा वापर करत अँजेलो मॅथ्यूजला माघारी जाण्यास भाग पाडले. यानंतर सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेल्सवर वाद सुरू झाला.
या सामन्यानंतर शाकिब अल हसनने Timed out Controversy प्रकरणावर मौन सोडले आणि म्हणाला,
“मॅथ्यूजच्या बाद करण्याच्या अपीलबाबत, माझ्या एका खेळाडूने येऊन मला सांगितले की जर आपण आता अपील केले तर त्याला बाद केले जाईल. मी अंपायरकडे गेलो आणि त्याला आऊट द्यायला सांगितले, तेव्हा अंपायरने विचारले की तुम्हाला हे नक्की करायचे आहे, मग मी म्हणालो की जर हे नियमात असेल तर त्याला आऊट द्या.
आम्ही एका सामन्यात आहोत आणि आमच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी करेन. ते योग्य की अयोग्य यावर नेहमीच चर्चा होईल, पण मी नियमानुसारच केले. असेही यावेळी शकीब म्हणाला.
शाकिब अल हसनपुढे बोलतांना म्हणाला की,
“जेव्हा आम्ही नाणेफेक जिंकलो तेव्हा आम्हाला प्रथम गोलंदाजी करण्यात कोणताही संकोच नव्हता. इथे दव पडतं हे आपण सरावात पाहिलं होतं. माझी आणि शांतोची भागीदारी अप्रतिम होती. आम्ही सामना थोडा लवकर संपवायला हवा होता आणि थोड्या कमी विकेट पडल्या होत्या. युवा खेळाडू हे आमच्या संघाचे भविष्य आहेत हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच आम्ही खेळाडूंना पाठीशी घालत आहोत.”
World Cup 2023: संपूर्ण विश्वचषकात शाकिब अल हसनची बॅट शांत राहिली
बांगलादेशसाठी आतापर्यंत ही एक विचित्र स्पर्धा राहिली आहे. कर्णधार शकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यांच्या संघाला 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधाराच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्यानेही बरीच निराशा केली आहे. शाकिबने 7 सामन्यात खराब फलंदाजी करताना 104 धावा केल्या आहेत, लंकेविरुद्ध त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक खेळी दिसली. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत.
हा सामना जरी बांग्लादेशने जिंकला असला तरीही या विजयापेक्षा जास्त चर्चा तर शकीबने केलेल्या निर्णयाची होत आहे.. तुम्हाला काय वाटत त्याचे कृत्य नियमात जरी बसत असले तरी खेळभावनेला जपणारे आहे का? कमेंट करून नक्की कळवा..
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी