IPL 2024: मुंबई इंडियन्स संघासोबतचे नाते तोडून शेन बॉण्ड बनला या संघाच चा सहाय्य प्रशिक्षक

IPL 2024:  न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉंड (Shane Bond) ला सोमवारी आयपीएल फ्रेंचाइजी टीम राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) संघाच्या वेगवान गोलंदाज प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक पदी नियुक्त करण्यात आलेली आहे. यापूर्वी शेन बॉंडने आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. 2012 ते 15 या दरम्यान न्यूझीलंड संघाच्या सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

48 वर्षे या माजी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडला 2015 मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यानंतर ते आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाबरोबर जोडले गेले. गेल्या 9 वर्षापासून मुंबई इंडियन्स सोबत तो काम करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन संघाने चार वेळा आयपीएलचा किताब जिंकला होता.

IPL 2024: राजस्थान रॉयल्सच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी शेन बॉण्डची नियुक्ती..

Shane Bond को है अपने गेंदबाज़ों से बदलाव की उम्मीद, आरसीबी..

नियुक्ती होताच राजस्थान रॉयल्स क्रिकेट निर्देशक कुमार संघकारा याने प्रतिक्रिया देताना म्हणाला की, शेन बॉंड हा जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडारा आहे.

शेन बॉंड आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना म्हणाला की,

 आयपीएल आणि भारतामध्ये कित्येक वर्षापासून मी सेवा देत आहे. राजस्थान रॉयल च्या संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा मिश्रण आहे त्यांच्यावर सोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव येईल.

 

शेन बोंड याने राजस्थान रॉयल बरोबर करार केल्यानंतर मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा माझी वेगवान गोलंदाज लसीथ मलिंगा याला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मागील वर्षी लसिथ मलिंगा हा राजस्थान रॉयलच्या संघाबरोबर जोडला गेला होता. आयपीएल फ्रँचायझीने शुक्रवारी शेन बाँडच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढली.

40 वर्षीय मलिंगा मुंबईकडून दीर्घकाळ खेळला आहे. आगामी हंगामापूर्वी तो मार्क बाउचर आणि त्याचा माजी सहकारी कायरन पोलार्ड यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षक संघात सामील होईल. तीन माजी क्रिकेटपटू संघाला मजबूत करतील, असा फ्रँचायझीचा विश्वास होता.

शेन बोंड

स्टार वेगवान गोलंदाजा लसीथ मलिंगा ने 2008 पासून मुंबई सोबत जवळपास 13 वर्ष घालवले. 11 वर्ष खेळाडू म्हणून तर एक वर्ष गोलंदाज सल्लागार म्हणून काम पाहिले होते. मलिंगाने मुंबई इंडियन सोबत एकूण 7 मालिका जिंकले आहे. त्यात चार आयपीएल दोन सी एल टी 20 आणि एक एमएलसी या स्पर्धांचा समावेश आहे.

2021 मध्ये निवृत्त होणाऱ्या मलिंगाने यापूर्वी राजस्थान रॉयल्स बरोबर काम केले आहे. या दोन दिग्गज गोलंदाजांच्या मार्गदर्शनाखाली संघ कशी कामगिरी करतो यासाठी पुढील आयपीएल स्पर्धांची वाट बघावी लागेल.


हेही वाचा: