भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामधे सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, जडेजा, महेंद्रसिंह धोनी , विराट कोहली, रोहित शर्मा असे जगप्रसिद्ध असलेले दिग्गज खेळाडू भारतीय संघात आहेत.

खेळाडू चांगला असणे म्हणजे त्या खेळाडू मध्ये चांगली कौशल्ये असणे तसेच खेळाडू चांगला घडवणे हे गुरू आणि कोच च्या हाती सुद्धा असत जिथं दिमाग आणि ताकत साथ देत नाही तिथं गुरूचा मोलाचं सल्ला कामी येतो हे आपल्याला माहीतच असेल.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात रवी शास्त्री आणि शार्दुल ठाकूर यांच्या मध्ये घडलेला एक मजेदार किस्सा सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया नक्की काय घडलं होता प्रकार.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 9फेब्रुवारी पासून कसोटी सामना सुरू होत आहे. तसेच या दोघात रंगत सुद्धा धमाकेदार होते. भारत ऑस्ट्रेलिया संघाच्या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत खोटं बोलला होता.
भारतीय संघाचा सामना वाचवण्यासाठी भारतीय संघाकडे केवळ 2 च फलंदाज राहिले होते. तेव्हा संघाला उपदेश देण्यासाठी रवी शास्त्री यांनी भारतीय संघात खेळत नसलेल्या शार्दुल ठाकूरे ला जवळ बोलावले.
आणि मैदानावर जाऊन एक निरोप पोहचवायला लावले, निरोप असा होता की, हनुमा विहारी वेगवान गोलंदाजांना खेळेल आणि आश्विन फिरकी गोलंदाजांना खेळेल. असा निरोप शार्दुल ठाकूर ला देण्यास सांगितले. तेव्हा शार्दुल ठाकूर हो म्हणून तिथून निघून गेला.
नंतर शार्दुल ठाकूर दोन्ही फलंदाजांजवळ पोहचल्यावर 6सांगितले की तुम्ही दोघे खूप चांगले खेळत आहात, तुम्ही फक्त तुमच्या मर्जी प्रमाणे खेळा असा निरोप शार्दुल ठाकूर ने फलंदाजांना दिला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने 1-2 ने दणदणीत विजय मिळवला. पहिल्याच सामन्यात भारत अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाला. त्यानंतर अथक प्रयत्न परिश्रम करून शेवटी भारतीय संघाने हरलेला सामना जिंकला.