shardul thakur viral video: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटी मंगळवारपासून सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे सुरू झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना टीम इंडियाच्या फलंदाजांची चांगलीच गोची झाली. सामाविवीर कर्णधार रोहित शर्मा डावाच्या 5व्याचं षटकात बाद झाला. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का होता आणि यांनतर संघाला एकामागे एक असे धक्के बसले.
यादरम्यान भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूरने आपल्या बेटने शौर्य दाखवले आणि संघाला अवघड परिस्थितीतून काढण्यास मदत केली.
शार्दुल ठाकूरच्या हेल्मेटवर लागला चेंडू, कपाळही सुजले,व्हिडीओ व्हायरल.
ही घटना भारतीय डावाच्या 44 व्या षटकात घडली जेव्हा शार्दुल ठाकूर जेराल्ड कोएत्झीच्या भडक बाऊन्सरवर पुल खेळण्यासाठी गेला, परंतु तो चुकला आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटला लागला. भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या कपाळावर सूज आली होती. ठाकूर यांनी तत्काळ फिजिओला मैदानावर बोलावण्याचे संकेत दिले आणि भारतीय संघाचे डॉक्टर त्याच्यावर उपचार करण्यासाठी खेळपट्टीकडे धावले. शार्दुलला कंसशन टेस्ट द्यावी लागली, जी प्रत्येक फलंदाजासाठी अनिवार्य आहे.
Shardul Thakur got hit hard on the helmet by Gerald Coetzee’s delivery! 😳
📷: Hotstar#ShardulThakur #SAvIND #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/BcYuTx6RVX
— Sportskeeda (@Sportskeeda) December 26, 2023
शार्दुल ठाकूरच्या सुजलेल्या भागावर बर्फ लावण्यात आला आणि नंतर ते पाहून त्याचे हेल्मेट बदलण्यात आले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने शौर्य दाखवत खेळी सुरू ठेवली.
काही वेळाने कागिसो रबाडाचा चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या कोपराच्या वरच्या भागात लागला. हा चेंडू ठाकूरलाही जोरदार लागला. मग ठाकूरने पट्टा बांधला आणि खेळत राहिला. शार्दुल ठाकूरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेदना होत असतानाही तो खेळत राहिला कारण त्यावेळी भारतीय संघ संघर्ष करत होता.
शार्दुल ठाकूरने केएल राहुलसोबत सातव्या विकेटसाठी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ठाकूरचा डाव कागिसो रबाडाने संपुष्टात आणला. भारतीय अष्टपैलू खेळाडूने 33 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. रबाडाच्या चेंडूवर कव्हर्समध्ये ठाकूरने जोरदार फटकेबाजी केली, पण डीन एल्गरने त्याचा चांगला झेल घेतला.
शार्दुल ठाकूरच्या धाडसी खेळीच्या समाप्तीनंतर, केएल राहुलने भारतासाठी समस्यानिवारणकर्त्याची भूमिका बजावली आणि संघाला 200 धावांच्या पुढे नेले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 59 षटकांत 8 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. केएल राहुलने 105 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. यजमान संघावर पूर्णपणे वर्चस्व राखण्यासाठी भारतीय संघ 250 धावांचा टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…