पहिल्यांदा विराट आणि आता ‘लॉर्ड’ ठाकूरला मिळाले गोल्ड मेडल! जाणून घ्या कारण; बीसीसीआयने केला व्हिडिओ शेअर
भारतीय संघ सध्या विश्वचषक 2023 खेळत आहे. चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीला गोल्ड मेडल सन्मानित करण्यात आले होते. तर अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मात्र लॉर्ड शार्दुल ठाकूर याला गोल्ड मेडल देऊन त्याचे कौतुक केले. विराटने हे गोल्ड मेडल शार्दुलच्या गळ्यात घातले. त्याचा हा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण यापूर्वी सुमार दर्जाचे होते. त्यात सुधारणा व्हावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी 2023च्या विश्वचषकात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला गोल्ड मेडल देण्याचा प्रथा सुरू केली. सामन्यात जो कोणी खेळाडू उत्तम क्षेत्ररक्षण करतो त्याला ‘फिल्डर ऑफ द डे’ चा किताब देऊन गौरविण्यात येते. गोल्ड मेडल देण्याच्या या प्रथेमुळे भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा दिसून येत आहे.
अनेक खेळाडू हवेत सूर मारत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूर याने सीमारेषाजवळ एक सुरेख झेल टिपला होता. त्याला प्रोत्साहन म्हणून हे गोल्ड मेडल देण्यात आले. शार्दुलने सीमारेषाजवळ झेल पकडून तो हवेत उडून पुन्हा तो झेल अलगदपने पकडला होता.
भारताचा तिसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात ‘बेस्ट फिल्डर ऑफ द डे’ कोण ठरणार?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..