शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यामुळे शिखर धवनची खुलणार किस्मत, बीसीसीआय करू शकते धवनला वर्ल्डकप साठी भारतीय संघात सामील.
शिखर धवन: टीम इंडियाने विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेटने जिंकला. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला, पण हा सामना संपल्यानंतर काही तासांनंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला कारण टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वर्ल्ड कप सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही तासांत ही बातमी समोर येत आहे की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विश्वचषक संघात रातोरात बदलांची घोषणा करू शकतो.
काही मिडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, शुभमन गिल संघातून बाहेर झाल्यामुळे संघाला एका अनुभवी सलामीवीराची गरज असल्यामुळे रोहित शर्मा आणि अजित आगरकर संघात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत. जर ही बातमी खरी ठरल्यास, भारतीय संघाचा अनुभवी सलामीवर शिखर धवन आपल्याला या विश्वचषकामध्ये भारतीय संघाकडून खेळतांना दिसू शकतो.
शुभमन गिलमुळे शिखर धवनसाठी उघडू शकतात संघाचे दरवाजे.
भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलला सध्या डेंग्यूचा त्रास आहे, त्यामुळे शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वर्ल्डकप सामना खेळू शकला नाही आणि आता अफगाणिस्तानविरुद्धच्या वर्ल्ड कप मॅचमधूनही तो बाहेर असल्याची बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलला विश्वचषक संघातून वगळण्याचा आणि शिखर धवनला विश्वचषक संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊ शकतो. भारतीय संघाकडे सध्या वर्ल्डकप सारख्या महत्वाच्या सामन्यात खेळण्यासाठी शिखर धवन सारखा अनुभवी दुसरा सलामीवीर नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये शिखर धवनचे आकडे आहेत एकदम जबरदस्त..
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज शिखर धवन हा ‘मिस्टर आयसीसी’ म्हणूनही ओळखला जातो. 2013 मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात शिखर धवनचीही महत्त्वाची भूमिका होती. याशिवाय शिखरने 2015 आणि 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप आणि 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपल्या बॅटची ताकद दाखवली होती. अश्या परिस्थितीमध्ये शुभमन ऐवजी शिखर भारतीय संघाकडून सलामी देतांना दिसू शकतो.
वनडे क्रिकेटमध्ये शिखर धवनची आकडेवारी
शिखर धवनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 167 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत धवनने 44.1 च्या सरासरीने आणि 91.3 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आपल्या कारकिर्दीत 6793 धावा केल्या आहेत. या काळात धवनने वांडा क्रिकेटमध्ये संघासाठी 17 शतके आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या एका वर्षात धवनला टीम इंडियासाठी जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे रोहितने जर धवनचा वर्ल्ड कप 2023 च्या संघात समावेश केला तर, त्याला 12 वर्षांनंतर टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवायला आवडेल. आणि त्यासाठी धवन आपला आजवरचा संपूर्ण अनुभव पणाला लावून फलंदाजीमध्ये आपले योगदान देईल.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..