Cricketer who Likely to announce Retirement: टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू कधीही जाहीर करू शकतो निवृत्ती, गेल्या अनेक दिवसापासून आहे संघातून बाहेर ..

0
15

Shikhar Dhavan Likely to Announce Retirement: भारतात क्रिकेटला खूप पसंती दिली जाते आणि त्यामुळेच बहुतांश तरुण आता क्रिकेटच्या क्षेत्रात आपले करिअर घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मात्र, क्रिकेटच्या दुनियेत करिअर करणे इतके सोपे नाही. असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियापर्यंत पोहोचले आहेत पण आता त्या खेळाडूंना संधी मिळत नाही.

त्यातलाच एक खेळाडू म्हणजे शिखर धवन(Shikhar Dhavan). शिखर धवनने आपल्या चमकदार खेळाच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला अनेकवेळा विजय मिळवून दिला आहे, मात्र त्याला दीर्घकाळ टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही, त्यानंतर आता शिखर धवन आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

सुरेश रैना ते केएल राहुल..! शिखर धवनच्या वाढदिवसानिमित्त स्टार खेळाडूंनी केला शुभेच्छांचा वर्षाव, सोशल मिडीयावर ट्वीटस तुफान व्हायरल..

Shikhar Dhavan likely to announce Retirement- शिखर धवन कधीही निवृत्त होऊ शकतो.

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhavan) हा त्याच्या चमकदार कामगिरीसाठी ओळखला जातो. शिखर धवनने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. मात्र युवा खेळाडू आल्यापासून संघ व्यवस्थापन सातत्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे.

इतकंच नाही तर शिखर धवनला असंही वाटतं की, आता टीम इंडियात त्याला स्थान नाही, तर त्याच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालसारख्या खेळाडूंना संधी द्यायला हवी. शिखर धवनचे हे विधान पाहता तो स्वतः टीम इंडियासाठी खेळू इच्छित नाही, असे दिसते, म्हणजेच शिखर कधीही त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर करू शकतो.

आयपीएलवर (IPL 2024) लक्ष केंद्रित करू शकतो शिखर धवन  (Shikhar Dhavan)

Cricketer who Likely to announce Retirement: टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू कधीही जाहीर करू शकतो निवृत्ती, गेल्या अनेक दिवसापासून आहे संघातून बाहेर ..

शिखर धवन(Shikhar Dhavan)  त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता पूर्णपणे आयपीएलवर लक्ष केंद्रित करेल. शिखर आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार आहे आणि आतापर्यंत पंजाबने एकही ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे शिखर धवन त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करेल आणि पंजाब संघाला आयपीएलमध्ये ट्रॉफी मिळवून देण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल.

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द (Shikhar Dhavan Cricket Carrer)

शिखर धवनच्या (Shikhar Dhavan)  आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने आपल्या कारकिर्दीत 34 कसोटी सामने खेळले आहेत आणि 58 डावात 2315 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा विक्रम आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 167 सामन्यांच्या 164 डावांमध्ये 6793 धावा केल्या आहेत.

Cricketer who Likely to announce Retirement: टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू कधीही जाहीर करू शकतो निवृत्ती, गेल्या अनेक दिवसापासून आहे संघातून बाहेर ..

ज्यामध्ये त्याच्या नावावर 17 शतके आणि 39 अर्धशतके आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 68 सामन्यांच्या 66 डावांमध्ये 1759 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या 11 अर्धशतकांचाही समावेश आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here