“हरणे किंवा जिंकणे हे मुद्दाम….” श्रीलंकेविरद्धच्या ट्वेंटी आणि एकदिवशीय संघात संधी न मिळाल्यामुळे शिखर धवन नाराज, व्हिडीओ पोस्ट करत साधला बीसीसीआयवर निशाणा, पहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ..
“हरणे किंवा जिंकणे हे मुद्दाम….” श्रीलंकेविरद्धच्या ट्वेंटी आणि एकदिवशीय संघात संधी न मिळाल्यामुळे शिखर धवन नाराज, व्हिडीओ पोस्ट करत साधला बीसीसीआयवर निशाणा, पहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ..
भारत पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय भूमीवर 3 सामन्यांची T20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने मंगळवारी भारतीय संघाची घोषणा केली. पण, आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही मालिकेत डावखुरा फलंदाज शिखर धवनला संघाचा भाग बनवण्यात आलेला नाही.
त्याच्यावर झालेल्या या अन्यायामुळे गब्बरच्या वेदनाही ओसंडून वाहत आहेत. धवनच्या पोस्टवरून त्याच्या वेदनांचा अंदाज येऊ शकतो, यातून त्याने बीसीसीआयवरही निशाणा साधला आहे.
शिखर धवनने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ खेळाडू शिखर धवन सध्या त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही तो विशेष काही कामगिरी करून दाखवू शकला नाही. एवढेच नाही तर या मालिकेतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणूनच की काय भारतीय निवड समितीने त्याला आगामी मालिकेसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
View this post on Instagram
यानंतर शिखरने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. मात्र, काही तासांनंतर त्याने पोस्ट केलेला व्हिडिओ डिलीट केला. पण, त्यानंतर त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर आगीसारखी पसरली होती. आपल्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करताना धवनने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “ जिंकणे किंवा हरणे आपल्या हातात नाही, ते हृदयाशी संबंधित आहे, काम करत राहा आणि बाकीचे देवावर सोडा.”
शिखरची ही पोस्ट व्हायरल होताच त्याने टी डिलीट केली ,ज्यामुळे सर्वत्र शिखर धवन बीसीसीआयवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. धवन आणि सलामीवीर पृथ्वी शो ने सुद्धा आपला प्रोफाईल फोटो रिमुव्ह केला होता. तेव्हाही त्याच्याबद्दल अशीच चर्चा रंगली होती.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अनेक वेळा शिखर धवनकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. या काळात त्याने कर्णधारपदाची काही छाप नक्कीच सोडली असली तरी बॅटने केलेली कामगिरी सामान्य होती. यावेळात काही काळ गब्बर फॉर्मबाहेर आहे. त्याची संथ फलंदाजी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. याआधी, त्याच्या संथ स्ट्राइक रेटमुळे त्याला टी-20 क्रिकेटमधून वगळण्यात आले होते.

यानंतर त्याला फक्त एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली. पण, इथेही त्याचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी होता. 2022 मध्ये त्याने एकूण 22 एकदिवसीय सामने खेळले आणि केवळ 688 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट फक्त 74.21 राहिला आहे. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याला ज्या प्रकारे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, ते पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, आगामी काळातही निवड समिती त्याच्याकडे या फॉरमॅटमधील खेळाडू म्हणून पाहत नाहीयेत.
म्हणूनच,आता शिखर जवळपास कसोटी, ट्वेंटी आणि एकदिवशीय संघातून बाहेर फेकला गेला आहे आणि पुन्हा कोणत्याही संघात पुनरागमन करण्याची संधी त्याला सहजा सहज मिळेल असे वाटत नाही. शिखरची कारकीर्द आता आयपीएल पुरतीच उरते की काय? असा प्रश्न आता चाहत्यांना पडतोय.