पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकताना दिसून येणार आहे. एका शोमध्ये तो गेस्टसोबत चर्चा आणि मजाक मस्ती करताना दिसून येणार आहे. हा शो सुरू होण्यापूर्वीच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ज्यामध्ये तो पाकिस्तानी अभिनेत्रीला निदा यासिरला एक प्रश्न विचारताना दिसून येत आहे.
शोएब अख्तरच्या प्रश्नावर काय म्हणाली गेस्ट??
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर आपल्या गेस्टला प्रश्न विचारताना दिसून येतोय. त्याने विचारले की, “१९९२ चा विश्वचषक पाकिस्तानने केव्हा जिंकला होता?” या शोमध्ये सहभागी झालेल्या गेस्टला हा प्रश्न समजून आला नाही. तिने पुन्हा रिपीट करण्यास सांगितले. तरीदेखील तिला हा प्रश्न समजून आला नाही. त्याने तिला म्हटले की, उत्तर हे प्रश्नातच लपलेलं आहे. तिने २००६ असे उत्तर दिले.
प्रश्नातच दडलं होतं उत्तर ..
यावेळी शोएब अख्तरने प्रश्न बदलून विचारला त्याने म्हटले की, “पाकिस्तानने २००९ चा वर्ल्डकप केव्हा जिंकला होता? यावेळी तिने उत्तर देत म्हटले की, ‘१९९२’ मात्र काही वेळानंतर तिला जाणवलं की, प्रश्न तर बदलला गेला आहे.
Let the memes begin! pic.twitter.com/QejWZbiLRU
— 𝓢𝓮𝓱𝓻𝓲𝓼𝓱 🇵🇰 (@itsmeSehrish) February 14, 2023
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, तसेच या व्हिडिओवर चाहते देखील मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.
हे ही वाचा…