‘हमारी छोरी किसीसे कम है क्या? शोभना आशाने 5 विकेट्स घेत रचला इतिहास, WPL मध्ये अशी कामफिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू.

'हमारी छोरी किसीसे कम है क्या? शोभना आशाने 5 विकेट्स घेत रचला इतिहास, WPL मध्ये अशी कामफिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू.

महिला प्रीमियर लीग 2024 चा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्या संघांमध्ये झाला. या सामन्यात स्मृती मानधनाच्या आरसीबीने शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी विजय मिळवला. संघाच्या विजयात गोलंदाज शोभना आशाचे महत्त्वाचे योगदान होते. तिने 4 षटकात केवळ 22 धावा देत 5 फलंदाजांना आपला बळी बनवले. यासह तीने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी ती या स्पर्धेच्या इतिहासातील पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

शोभनाने ५ बळी घेतले.

RCB vs UPW: रातोरात स्टार झालेली आशा शोभना नक्की कोण आहे? घरची परिस्थिती होती अत्यंत हालाकीची,

आरसीबीची लेगब्रेक गोलंदाज शोभना आशाने 48 धावांवर यूपी संघाला दणका दिला आणि वृंदा दिनेश (18 धावा) यष्टीरक्षक रिचा घोषकडे झेलबाद झाली. या सामन्यातील शोभनाची ही पहिली विकेट होती. यानंतर तिने अप्रतिम गोलंदाजी करत ताहलिया मॅकग्रा (22 धावा), ग्रेस हॅरिस (38 धावा), श्वेता सेहरावत (31 धावा) आणि किरण नवगिरी (1 धाव) यांना एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शोभनाने या सामन्यात 4 षटकांच्या स्पेलमध्ये 22 धावांत 5 बळी घेतले.

RCB vs UPW: रातोरात स्टार झालेली आशा शोभना नक्की कोण आहे? घरची परिस्थिती होती अत्यंत हालाकीची,स्वतः मेहनत करून पोहचली इथपर्यंत..!

शेवटच्या चेंडूवर आरसीबीने विजय मिळवला.

शेवटच्या षटकात यूपी संघाला 11 धावांची गरज होती. श्रेयंका पाटीलने 18व्या षटकात 14 धावा दिल्या. शेवटच्या दोन षटकात यूपी वॉरियर्सला विजयासाठी 12 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या, पण 19व्या षटकात संघाची एक गडी गमावून केवळ पाच धावा करता आल्या. आता शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती, पण संघाला केवळ 8 धावा करता आल्या आणि यासह यूपी संघाला 2 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

'हमारी छोरी किसीसे कम है क्या? शोभना आशाने 5 विकेट्स घेत रचला इतिहास, WPL मध्ये अशी कामफिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू.

त्याआधी प्रथम फलंदाजी करतांना यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोष (६२ धावा) आणि सबिनेनी मेघना (५३ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ बाद १५७ धावा केल्या. 44 चेंडूंचा सामना करत मेघनाने आपल्या डावात सात चौकार आणि एक षटकार मारला, तर ऋचाने 37 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार मारले. त्यानंतर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 50 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली, तेव्हा फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर संघाने 7.5 षटकात 54 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्स संघाला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 155 धावा करता आल्या.


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *