टी 20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडच्या संघाला धक्का:  अष्टपैलू खेळाडू पडला बाहेर

या 7 दिग्गज वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये खेळलेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, यादीमधील दुसरे नाव सर्वांत आच्छर्यकारक..!

आयपीएल 2024 हंगाम संपल्यानंतर लगेच जूनमध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला असून इंग्लंडच्या निवड समितीला त्याने पत्र लिहून या स्पर्धेत उपलब्ध नसल्याचे कळवले आहे.  बेन स्टोक्सने 2022 मध्ये पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना इंग्लंडला विश्व चॅम्पियन बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

स्टोकसने मागील वर्षी भारतात झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर स्पर्धा तोंडावर असताना त्याने आपला राजीनामा मागे घेतला आणि विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रिया नंतर तो जास्त क्रिकेट खेळत नाही. नुकतेच त्याने आयपीएल मधूनही माघार घेतली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने केवळ 5 षटके गोलंदाजी केली. काउंटी चॅम्पियनशिप डरहम कडून तो आता काही दिवस क्रिकेट खेळणार आहे.

स्टोक्स म्हणाला की, क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलूच्या भूमिकेसाठी मी माझी गोलंदाजी व फिटनेस मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. आयपीएल आणि विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणे हे बलिदान करणे म्हणजे नजीकच्या भविष्यात एक चांगला अष्टपैलू बनण्यास मदत करेल. नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, शस्त्रक्रियेनंतर नऊ महिने गोलंदाजी करू न शकल्यामुळे गोलंदाजीच्या बाबतीत मी किती मागे आहे हे मला जाणवले. मी उन्हाळ्यात काउंटी चॅम्पियनशिप दरम्यान डरहॅमकडून खेळण्यास उत्सुक आहे. जोस बाल्टर, मॅथ्यू मॉट आणि संपूर्ण संघाला चषक आपल्याकडे राखण्यासाठी मी शुभेच्छा देतो.

स्टोक्सने शस्त्रक्रियेपूर्वी T20 विश्वचषक खेळण्यासाठी निश्चित नव्हते, परंतु गेल्या आठवड्यात त्याने सांगितले की तो स्पर्धेसाठी उपलब्ध असेल अशी आशा आहे. इंग्लंडच्या वनडे संघचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी डिसेंबरमध्ये सांगितले की, स्टोक्सची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. मॉट पुढे म्हणाले की, ‘स्टोक्स आम्हाला सहावा वेगवान गोलंदाज पर्याय म्हणून उपलब्ध करून देतो, ज्यामुळे आम्हाला संघात समतोल साधण्याची संधी मिळते.’