क्रिकेट हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात क्रिकेट चे असंख्य प्रेमी आहेत. आपल्या भारत देशात लोकांना क्रिकेट चे वेड हे लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत आहे. भारतीय क्रिकेट संघ हा सर्व देशातील संघात अग्रेसर आहे. आपल्या देशातील अनेक खेळाडू सुद्धा देशभर प्रसिद्ध आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात घडलेला किस्सा सांगणार आहे. तर जाणून घेऊया नक्की काय प्रकार घडला होता.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत आणि वादात असतो हे आपल्याला माहीतच आहे. सध्या काही दिवसांपूर्वी च त्याने पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
एवढेच नव्हे तर शोएब अख्तर ने संपूर्ण पाकिस्तानी क्रिकेट संघावर जोरदार टीका केली आहे. मात्र पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांना शोएब अख्तर ने केलेली टीका अजिबात आवडली नाही त्यामुळे रझिम राजा यांनी शोएब अख्तरला चांगलेच सुनावले आहे.
शोएब अख्तरने नुकतेच सांगितले की, सध्या पाकिस्तान क्रिकेट संघात एक ही पात्र खेळाडू नाही तसेच कोणालाच बोलायचे काही समजत नाही आणि त्यात इंग्लिश चे वांदे सुद्धा आहेतच. जेव्हा संघ मैदानावर परफॉर्म साठी येतो तेव्हा सुद्धा अनेक खूप विचित्र गोष्टी ठरतात.
तसेच आपल्या देशातील खेळाडूंना इंग्लिश येत नसल्यामुळे प्रसार माध्यांमध्ये सुद्धा स्वताला एक्सपैन करू शकत नाही. शोएब म्हटला की मला उघडपणे सांगायचे आहे की बाबर आझम हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड असावा. पण त्याला इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळेच तो ब्रँड होऊ शकला नाही.
शोएब अख्तर ने केलेल्या या विधानामुळे रजीम राजा यांना शोएब अख्तर चा खूप राग आला होता. यावर रजिम राजा यांनी शोएब ला चांगलेच सुनावले रमीझ राजा म्हणाले की, शोएब अख्तर हा गोंधळात टाकणारा सुपरस्टार आहे. नुकताच त्याचा कामरान अकमलसोबत सुद्धा वाद झाला होता. प्रत्येकाने ब्रँड व्हावे अशी त्याची इच्छा आहे. पण त्याआधी माणूस होणे खूप महत्वाचे आणि गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले- आमच्या माजी खेळाडूंनी दिशाभूल करणारी विधाने करून क्रिकेटचा नाश झालेला आहे. आमच्या शेजारच्या देशात असे घडताना तुम्ही कधीच पाहिले नसेल सुनील गावस्कर यांना राहुल द्रविडवर टीका करताना तुम्ही पाहिले नसेल. हे फक्त पाकिस्तानात घडते, जेथे माजी खेळाडू इतर खेळाडूंना त्यांचे काम करू देत नाहीत. प्रत्येक सामन्यादरम्यान माजी खेळाडू हे खेळात अडचणीत वाढवण्याचे काम करतात.