वडिलांचा अब्जावधींचा व्यवसाय सोडून खडतर संघर्ष करून बनला भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू, भारतीय संघात सर्वाधिक धावा चा विक्रम
प्रामुख्याने आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, परंतु हॉकी पेक्षा आपल्या देशात क्रिकेट ला जास्त पसंती आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे वेडे आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे सर्वाधिक आहे.
भारताची लोकसंख्या ही जगात पहिल्या स्थानावर आहे आणि या सर्वांमधून अवघ्या 15 खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळण्यासाठी संधी मिळते मग तुम्हीच विचार करा प्रत्येक खेळाडूंचा किती खडतर असेल हा प्रवास.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने अब्जावधी रुपयांचा घरचा व्यापार करायचा सोडून अत्यंत खडतर प्रवास करून क्रिकेट मध्ये आपले करियर बनवले आहे. तर चला तर जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.
क्रिकेट मध्ये करियर बनवायचे असेल तर आयुष्यात खडतर प्रवास करूनच ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. तसेच क्रिकेट मध्ये परफॉर्मन्स सुद्धा खूप आवश्यक असतो.
श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज आहे. 2022 मध्ये श्रेयस अय्यर ची कामगिरी अत्यंत चांगली होती आणि श्रेयस अय्यर ने भारतासाठी सर्वाधिक धावा सुद्धा काढल्या आहेत.
श्रेयस अय्यरबद्दल सांगायचे म्हतले तर श्रेयस अय्यर चा जन्म हा ६ डिसेंबर १९९४ रोजी झाला. त्याने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. श्रेयस अय्यरने 2017 मध्ये भारतीय संघात सुद्धा पदार्पण केले. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 49 टी-20, 40 एकदिवसीय आणि 7 कसोटी सामने खेळले आहेत. अत्यंत खडतर प्रवास करून श्रेयस अय्यर ने भारतीय संघात स्थान मिळवले.

श्रेयस अय्यर च्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर श्रेयस अय्यर चे कुटुंब खूपच लहान आहे. त्यांच्या वडिलांचे नाव हे संतोष अय्यर आहे आणि आईचे नाव रोहिणी अय्यर आहे. श्रेयस अय्यरला श्रेष्ठा अय्यर नावाची एक बहीण देखील आहे आणि ती एक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहे. घरचा स्वतःचा व्यवसाय असून देखील श्रेयस अय्यर ने क्रिकेटपटू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट केले आणि आज तो ज्या स्थानावर पोहोचला आहे तो केवळ त्याच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे. आज जगभरात मोठ्या प्रमाणावर श्रेयस अय्यर चे फॅन्स देखील आहेत.