भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळातही श्रेयस अय्यर संघासाठी शानदार फलंदाजी करताना दिसला.
पहिल्या दिवसाच्या खेळात सुरुवातीचे फलंदाज फ्लॉप झाल्यानंतर अय्यरने टीम इंडियाचा डाव अतिशय सुरेखपणे हाताळला. पण कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावण्यास तो हुकला. त्यामुळे चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत होते.
बांगलादेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर श्रेयस अय्यर सोशल मिडीयावर ट्रेंड!
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार केएल राहुलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे सलामीचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. त्यानंतर ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने संघाची धुरा सांभाळत यजमानांना बॅकफूटवर आणले. मात्र, पंत बाद होताच पाहुण्या संघाने डगमगायला सुरुवात केली.

अशा स्थितीत श्रेयस अय्यरने पहिल्या दिवसाच्या खेळात पुजारासोबत शानदार भागीदारी करत संघाला खेळात परतवले. पण पुजारा ९० धावांची खेळी करत पहिल्याच दिवशी पॅव्हेलियनमध्ये परतला. पण पहिल्या दिवशी 82 धावा केल्यानंतर अय्यर क्रीजवर नाबाद राहिला.
अय्यरने (श्रेयस अय्यर) अश्विनच्या साथीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. त्यानंतर या सामन्यात अय्यर आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावेल, अशी आशा चाहत्यांना वाटू लागली. पण असे होऊ शकले नाही आणि त्याला 86 धावांची खेळी करता आली. शतक हुकल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. काही चाहत्यांनी त्याला जल्लोष केला, तर चाहत्यांच्या एका गटाने त्याला ट्रोल केले.
श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर चाहत्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या.
Shreyas Iyer ko itane Chances mile iss matche me fir 100 nhi kar paya 😭
— AVI29 🇮🇳 (@SportsLover029) December 15, 2022
Shreyas Iyer goes for 86 in 192 balls – missed out from a century there, a fine knock from Iyer. He's having a dream year! pic.twitter.com/opEIoueqHf
— GOURAB (@Gourabsrk7) December 15, 2022
Aaj bhi Shreyas Iyer ka 1 easy catch drop hua fir bhi wo capitalize nahi kar paya aisa lag raha tha mano Bangladesh wale khud nahi chahte the Shreyas Iyer ko out karna 🤣🤣
— Innovative man (@Innovativeman3) December 15, 2022
💔Well played knock Shreyas Iyer 86(192) 🙌🏻🙌🏻 #BANvIND #WTC23 pic.twitter.com/v3lchCQWAL
— Nowful Khan (@nowfulKhan) December 15, 2022
#ShreyasIyer does the hardwork, gets settled, faces difficult balls, and what not, but somehow fails to convert the 50s into 100s… If he had converted his 50s or 80s into 100s, then he would've had at least 5-6 tons in ODIs and 3 tons in Tests
— Aalok Sensharma (@SensharmaAalok) December 15, 2022
Shreyas Iyer departs after a well made 86 off 192 .. Finally a sigh of relief to Ebadot Hussain and Bangladesh. Ride of the luck comes to an end for Iyer. India 293/7 after 98 overs.
— 🅒🅡🅘︎🅒︎🄲🅁🄰🅉🅈𝗠𝗥𝗜𝗚𝗨™ 🇮🇳❤️ (@MSDianMrigu) December 15, 2022
Doesn't seem u were batting on 86, how come u missed such an easy ball brother?#ShreyasIyer #Cricket #indvsbang
— Shivam Pratik (@PratikPrince4) December 15, 2022
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…