IND vs SL: श्रेयस अय्यरने मोडला 40 वर्षापूर्वीचा विक्रम, विश्वचषकात अशी कामगिरी करणारा ठरला 5 वा भारतीय फलंदाज…

IND vs SL: श्रेयस अय्यरने मोडला 40 वर्षापूर्वीचा विक्रम, विश्वचषकात अशी कामगिरी करणारा 5 वा भारतीय फलंदाज...

श्रेयस अय्यर, IND vs SL:  विश्वचषक स्पर्धेतील 33 वा सामना आज भारत आणि श्रीलंका (IND VS SL) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करतांना 8गडी गमावून 357 धावांचा डोंगर उभा केला आहे. 

भारतीय संघाच्या पारीमध्ये स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreys iyer) श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये परतला आणि त्याने 56 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी खेळली. 2023 च्या विश्वचषकातील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. अय्यरने या डावात एकच नाही तर अनेक पराक्रम केले. त्याने २०२३ च्या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार ठोकला. वनडेमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. इतकंच नाही तर 40 वर्षांपूर्वी कपिल देव यांनी एक विक्रम देखील मोडला आहे.

kapil-dev-on-indian-cricket

IND vs SL: श्रेयस  अय्यरने मोडला कपिल देव यांचा 40 वर्षापूर्वीचा विक्रम.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने 82 धावांच्या खेळीत एकूण 6 षटकार ठोकले आहेत. सध्या त्याने एका खेळीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत टीम इंडियाचे माजी कर्णधार  कपिल देव (Kapil Dev) यांनाही मागे सोडले आहे.

कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध एका डावात सहा षटकार ठोकले होते. हे 40 वर्षांपूर्वी घडले होते . तर टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने या विश्वचषकाच्या एका सामन्यात पाकिस्तानविरुद्ध सहा षटकारही ठोकले. . मात्र या यादीत सौरव गांगुली आणि युवराज सिंग अव्वल आहेत. श्रेयसने ही आता या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

एकदिवसीय विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय खेळाडू (Indian cricketer who smashed most six in 1 ODI match)

  • 7   सौरव गांगुली विरुद्ध श्रीलंका, टॉंटन (1999)

  • 7 – युवराज सिंग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन (2007)

  • 6 – कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स (1983)

  • ६ – रोहित शर्मा वि. पाकिस्तान, अहमदाबाद (२०२३)

  • ६ – श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, मुंबई- वानखेडे, (२०२३, समान सामना)

IND vs SL: टीम इंडिया विजयाच्या जवळ, श्रीलंकेचा डाव घसरला.

IND vs SL: श्रेयस अय्यरने मोडला 40 वर्षापूर्वीचा विक्रम, विश्वचषकात अशी कामगिरी करणारा 5 वा भारतीय फलंदाज...

या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी सरस राहीली आहे. सलामीवीर शुभमन गिलने (Shubhman Gill) सर्वाधिक ९२ धावा केल्या. तर विराट कोहलीने 88 धावांची शानदार खेळी करत पुन्हा एकदा आपला फॉर्म दाखवला. यानंतर श्रेयस अय्यरच्या 56 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी आणि रवींद्र जडेजाच्या 35 धावांच्या जोरावर भारताने 357 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने सलग सहा विजयांची नोंद केली होती. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. त्यानंतर मोहम्मद सिराजने पहिल्या दोन षटकांत तीन बळी घेतले. टीम इंडियाने जवळपास हा सामना जिंकला आहे.

 

….बातमी अपडेट होत आहे..


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *