“माझ्यासाठी आयपीएल पेक्षा देश महत्वाचा” एकदिवशीय वर्ल्डकप खेळण्यासाठी ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय, सर्वच स्तरातून होतय कौतुक..
“माझ्यासाठी आयपीएल पेक्षा देश महत्वाचा” एकदिवशीय वर्ल्डकप खेळण्यासाठी ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय, सर्वच स्तरातून होतय कौतुक..
आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसताना दिसत आहे. कारण रिपोर्ट्सनुसार, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर(Shreyas Iyer) आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर जाऊ शकतो. दुखापती पाहता बीसीसीआय आणि एनसीएने श्रेयसला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता पण श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आयपीएलपेक्षा वर्ल्डकपला महत्त्व दिले.

भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे श्रेयस एकदिवसीय मालिकाही खेळू शकला नाही आणि आता तो कदाचित आयपीएलच्या पूर्वार्धातूनही बाहेर पडू शकतो. वास्तविक श्रेयस अय्यरची सध्या शस्त्रक्रिया होत नसल्याने तो आयपीएलपेक्षा विश्वचषक खेळण्याकडे अधिक लक्ष देत आहे.(या 4 भारतीय खेळाडूंनी वनडेच्या एका षटकात ठोकल्यात सर्वाधिक धावा, एकाने तर तब्बल दोन वेळा केलाय पराक्रम…)
कारण श्रेयसवर शस्त्रक्रिया झाल्यास त्याला किमान ६ ते ७ महिने मैदानाबाहेर राहावे लागेल. त्यामुळे त्याला एकदिवसीय विश्वचषकाचा भाग बनणेही कठीण जाईल आणि अय्यरला विश्वचषकातून बाहेर जाण्याचा धोका अजिबात घ्यायचा नाही.
View this post on Instagram
श्रेयस अय्यर हे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे.
श्रेयस अय्यर सध्या घरीच आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दुखापतीमुळे, अय्यरच्या पाठीच्या कण्यामध्ये फुगवटा आहे ज्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या भीतीने त्याने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर आजकाल लोक आयुर्वेदाकडेही पाहत आहेत. त्याच्या पाठीवर आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत. त्याच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याचे अद्याप निश्चित झालेले नाही. पण 16 व्या मोसमाच्या पूर्वार्धात तो मुकू शकतो हे निश्चित.(हार्दिक पंड्याच नाही तर या पाकिस्तानी खेळाडूनेही एकाच मुलीशी केलय दोन वेळा लग्न, त्यामागचे कारण मात्र जरा वेगळंय..!)
यावर्षी क्रिकेटच्या महाकुंभाचे आयोजन भारत करत आहे.
यावेळी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताशिवाय कोणीही नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ही मेगा ICC स्पर्धा आयोजित केली जाईल. त्यामुळे सामन्याच्या ठिकाणासाठी अनेक शहरांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतातील 12 मोठ्या शहरांच्या नावांचा समावेश आहे. भारतीय संघही भारतात होत असलेल्या या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या आयसीसी ट्रॉफीचा 12 वर्षांचा दुष्काळ संपवू इच्छित आहे.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..