‘वर्ल्डकप फिक्स आपलाय..” शुभमन गिलनंतर श्रेयस अय्यरनेही ठोकले शानदार शतक, वर्ल्डकपआधी टीम इंडियाचे शिलेदार शानदार फॉर्ममध्ये..!
भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील दुसरा एकदिवशीय सामना आज (24 सप्टेबर) इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रेयस अय्यरने इंदोर एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले. श्रेयस ने 86 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे.
या शतकासह श्रेयस अय्यरने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी पेश केली आहे. शतक झळकावल्यानंतर लगेचच श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. यापूर्वी मोहाली वनडेत श्रेयस अय्यर लवकर बाद झाला होता. मात्र या सामन्यात शानदार पुनरागमन केले.

श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल ने ठोकले शानदार शतक..
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 16 धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला.
सलामीवीर रुतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. पण यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताच्या दोन्ही फलंदाजांनी सहज धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी झाली. आणि दोघांनीही शतक ठोकत संघाची धावसंख्या वाढवली..
श्रेयस अय्यरने शतक ठोकत विश्वचषकासाठी केला दावा…!
याआधी केएल राहुलने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. याशिवाय विराट कोहली आणि इशान किशनसारखे खेळाडू मधल्या फळीत आहेत. त्यामुळे विश्वचषकासाठी मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये रंजक लढत होत असली तरी श्रेयस अय्यरने आपल्या शतकाच्या जोरावर आपली दमदार दावेदारी मांडली आहे.
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..