“त्या दोघांनी जवळपास सामना आमच्या हातातून हिसकावला होता” श्रीलंकेचा कर्णधार ‘दासून शनाका’ सुद्धा सूर्या आणि अक्षर पटेलच्या खेळीचा झाला चाहता, सामना संपल्यानंतर दोघांची स्तुती करत केले मोठे विधान.
काल भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्याच्या मैदानावर खेळवला गेला. ज्यात श्रीलंकेने भारतावर 16 धावांनी विजय मिळवला. या विजयात कर्णधार दासून शानाकाची अर्धशतकीय खेळी महत्वाची ठरली.
भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दासून शनाकाची कामगिरी उत्कृष्ट ठरली. त्याने स्फोटक फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पाहुण्या संघाने 6 गडी गमावून 207 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य भारतीय संघापुढे ठेवले. प्रत्युत्तरात यजमानांना निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. त्याच वेळी, दासूनच्या या योगदानासाठी, त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.
View this post on Instagram
विजयानंतरही दासून शनाका संघाच्या कामगिरीवर खूश नाही.
खरे तर श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी भारतीय संघाविरुद्ध अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे कॅप्टन दासून शनाका खूप निराश झाला. सामना संपल्यानंतर त्याला सामनावीराचा किताब मिळाला आणि तो म्हणाला,
“आम्ही मधल्या फळीत चांगली कामगिरी करू शकलो असतो. सलामीवीरांनी चांगला खेळ मांडला. मधल्या फळीत चांगले खेळणे आवश्यक आहे जेणेकरून फिनिशर चांगले फिनिश करू शकतील. हेआमचे अपयश नसून भारतीय फलंदाजांचे कौशल्य आहे. सूर्या आणि अक्षर अप्रतिम होते. त्यांनी आमच्याकडून सामना हिरावून घेतला, पण तरीही आम्ही आमचा संयम राखण्यात यशस्वी झालो. विशेषत: भारतीय खेळपट्ट्यांवर भारताविरुद्ध अशा बेरजेचा बचाव करणे चांगले आहे.

दासुन शनाकाने धडाकेबाज अर्धशतकी खेळी खेळली
भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दासूनने चांगली कामगिरी केली. त्याच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे पाहुण्या संघाला सामना जिंकता आला. मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ डळमळीत दिसत असताना, दासुन शनाकाच्या धडाकेबाज खेळीने संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
View this post on Instagram
त्याने फक्त 22 चेंडूत 56* धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्याशिवाय कुसल मेंडिसनेही संघाच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने ५२ धावा केल्या. कुसल आणि दासूनच्या अर्धशतकांमुळे पाहुण्यांना २०७ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले, जे यजमानांना गाठण्यात अपयश आले. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून मालिकेचा अंतिम सामना उद्या राजकोट येथे खेळवला जाणार आहे. आणि हाच सामना जिंकणारा संघ मालिकासुद्धा जिंकेल.