Viral Video: चालू सामन्यात शुभमन गिल भडकला, सारा भाभी- सारा भाभी म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलरकडे पाहून केले असे कृत्य; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

0
2
Viral Video: चालू सामन्यात शुभमन गिल भडकला, सारा भाभी- सारा भाभी म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलरकडे पाहून केले असे कृत्य;व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...

शुभमन गिल:  गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यातील IPL 2024 चा 24 वा सामना जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात जीटीचा कर्णधार शुभमनने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यानंतर सामन्यादरम्यान अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे गिल चर्चेत राहिला. कधी तो चाहत्यांच्या निशाण्यावर होता तर कधी अन्य कारणाने तो वादात सापडला होता. या सामन्यातील शुभमन गिलशी संबंधित अशा घटना पाहूया ज्यात तो आक्रमक  होताना दिसला आहे.

चाहत्यांनी शुभमन गिलची खिल्ली उडवली,आणि गीलचा सुटला ताबा..

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा शुभमन गिलचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले आणि पॉवर प्लेमध्ये आरआरचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जॉस  बटलर बाद झाले. मात्र यानंतर सॅमसन आणि रियान पराग यांनी आपल्या फलंदाजीची जादू दाखवत जीटी गोलंदाजांची दाणादाण उडवली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली.
यावेळी, जीटीचे चाहते शांत दिसत असताना, आरआरच्या चाहत्यांनी सारा भाभी-सारा भाभीच्या घोषणा देत शुभमन गिलला चिडवले.

चाह्ते त्याला सारा भाभी म्हणून चिडवत असतांना गिलचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांना गप बसण्याचे संकेत दिले. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय..

शुभमन गिलची अंपायरशी देखील झाले वाद..!

शुभमन गिल या सामन्यात अनेक वेळा संयम गमावताना दिसला. एकीकडे चाहते त्याला सारा भाभी सारा भाभी म्हणून ट्रोल करत असतांना  तो मैदानी पंचांकडे गेला आणि तिसऱ्या पंचाच्या निर्णयाला 17व्या षटकातील शेवटचा चेंडू प्रथम खरा आणि नंतर वाईड मानण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंचाशी वाद घालणे आणि निर्णयावर आक्षेप घेतल्याने शुभमनला दंडही ठोठावला गेला.

Viral Video: चालू सामन्यात शुभमन गिल भडकला, सारा भाभी- सारा भाभी म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलरकडे पाहून केले असे कृत्य;व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...

टीम इंडियाच्या युवा फलंदाजांमध्ये शुभमन गिल हा सर्वात प्रतिभावान मानला जातो. तिन्ही फॉरमॅटमधील त्याची कामगिरी लक्षात घेता त्याला भारतीय क्रिकेटचा प्रिन्स म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेटमध्ये गिलच्या उदयानंतर, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतात.

मात्र या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच हे दोघे कधीही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे, सर्व अफवा असूनही, सारा आणि गिलच्या नात्याच्या सत्यतेचा कोणताही ठोस पुरावा नाही. तरीही सोशल मीडिया या दोघांना एकमेकांशी जोडण्यापासून परावृत्त होत नाही.

पहा व्हायरल व्हिडीओ,

शुभमनच्या नेतृत्वात सध्या गुजरात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. शुभमन आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून देऊ शकतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे..


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here