“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” शुभमन गिल च्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला. शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल

“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” गिलच्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला. शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबादमध्ये खेळली गेलेली बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटची कसोटी अनिर्णित राहिली. कसोटीच्या शेवटच्या दिवशी कमी धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला बाद करून भारताला विजयाची संधी होती, मात्र टीम इंडियाला त्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन यांनी क्रीजवर फलंदाजी करताना भारताचे विजयाचे मनसुबे उधळून लावले. हेडने 163 चेंडूत 90 धावा केल्या, तर लाबुशेनने 213 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिला.
सामन्यादरम्यान एक वेळ अशी आली की ,नियमित गोलंदाजांना विकेट मिळत नसल्याचे पाहून कर्णधार रोहित शर्माने अर्धवेळ गोलंदाजांकडे चेंडू सोपवला.
अर्धवेळ म्हणा किंवा क्वचितच गोलंदाजी करताना दिसणारे दिग्गज फलंदाज पाहून अहमदाबाद स्टेडियममध्ये बसलेले चाहते आणि टीव्हीला चिकटलेले चाहतेही रोमांचित झाले. कर्णधारानेही चेंडू गिलकडे सोपवला आणि त्यानंतर काय झाले याची कल्पनाही शुभमन गिलला नव्हती.

शुभमन गिल गोलंदाजीस येताच चाहते लागले जल्लोष करायला..
शुभमन गिल त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो पण, अहमदाबाद कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या शेवटच्या काही मिनिटांत कर्णधार रोहित शर्माने त्याच्याकडे चेंडू सोपवला. चेंडू हातात येताच गिल एका महान गोलंदाजासारखा दिसू लागला.
त्याला गोलंदाजी करताना पाहून संघातील इतर खेळाडूच नव्हे तर चाहतेही रोमांचित झाले आणि गिलमध्ये हरभजन सिंगची छबी शोधू लागले. गिलच्या गोलंदाजीचा व्हिडिओ (शुबमन गिल गोलंदाजीचा व्हिडिओ) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…