शुभमन गिल हा भारतीय संघासाठी जोरदार कामगिरी करतोय. अहमदाबादच्या मैदानावर शुभमन गिलने जोरदार कामगिरी करत, शतक झळकावले. यासह त्याने तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश केला आहे. शुभमन गिलने या सामन्यात सुरेश रैनाचा विक्रम मोडत, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी सारख्या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात शुभमन गिलने नाबाद १२६ धावांची खेळी केली. यासह तो टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुभमन गिलचे वय २३ वर्ष १४६ दिवस इतके आहे. यापूर्वी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावे होता. सुरेश रैनाने वय २३ वर्षे १५६ दिवस असताना शतक झळकावले होते. तसेच कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, सचिन तेंडुलकरने वय १७ वर्षे १०७ दिवस असताना शतक झळकावले होते. तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम, विनोद कांबळीच्या नावे आहे. विनोद कांबळीने वयाच्या २१ व्या वर्षी वनडेतील पहिले शतक झळकावले होते.

शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. सुरुवातीला त्याने संयम दाखवला, मात्र त्यानंतर त्याने किवी गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. टी -२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणं सोपं नसतं कारण,फलंदाजांना खूप कमी चेंडूंचा सामना करण्याची संधी मिळते. या सामन्यात त्याने ६३ चेंडूंचा सामना करत १२६ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २३४ धावा करण्यात यश आले होते.
हे ही वाचा..
एमएस धोनीने निवृत्ती घेतल्यापासून अचानक सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे – हार्दिक पंड्या
शुभमन गिल नव्हे तर सूर्यकुमार यादवने ‘या’ खेळाडूला म्हटले ‘गेम चेंजर’