- Advertisement -

शुभमन गिल ऑन फायर! कारकिर्दीतील केवळ सहाव्या सामन्यात शतक ठोकत रोहित अन् विराटला सोडलय मागे

0 0

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात, शुभमन गिलच्या (Shubhman gill) फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. शुभमन गिलवर टीका केली जात होती की, वनडे आणि कसोटी साठी ठीक आहे मात्र शुभमन गिल हा टी -२० साठी योग्य नाहीये. मात्र त्याने किवी गोलंदाजांची धुलाई करत शतकी खेळी केली. यासह त्याने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या सामन्यात ईशान किशन आणि शुभमन गिल हे दोघेही सलामीला फलंदाजी करण्यासाठी आले होते. ईशान किशन स्वस्तात माघारी परतला. मात्र शुभमन गिलने शेवटपर्यंत किल्ला लढवला.

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मोजकेच खेळाडू आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, दीपक हुड्डा आणि सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. शुभमन गिलने या सामन्यात ६३ चेंडूंचा सामना करत नाबाद १२६ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. शुभमन गिलने एकदा गियर टाकल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. त्याने किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यासह त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.

शुभमन गिल

शुभमन गिलने भारतीय संघासाठी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी केली आहे. यापूर्वी भारतीय संघासाठी कुठलाही फलंदाज टी -२० क्रिकेटमध्ये १२६ धावा करू शकला नव्हता. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी होता. विराटने आशिया चषक स्पर्धेत अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १२२ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने ११८ धावांची खेळी केली होती. या यादीत विराट दुसऱ्या तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

हे ही वाचा..

हे 4 लोकप्रिय खेळाडू जे आपल्या शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये शून्य धावांवर बाद झाले, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू.

INDvsAUS: भारतीय संघाला मोठा धक्का… गावसकर ट्रॉफीआधी टीम इंडियाचा हा दिग्गज कसोटी खेळाडू जखमी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे वाटतय अशक्य..

 

Leave A Reply

Your email address will not be published.