उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शुभमन गिलला खास विक्रम करण्याची संधी, विराट कोहलीला सोडू शकतो मागे..

उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शुभमन गिलला खास विक्रम करण्याची संधी, विराट कोहलीला सोडू शकतो मागे..

भारतीय संघाचा दक्षि आफ्रिका दौरा उद्यापासून सुरु होत आहे. या दौऱ्यात  शुभमन गिल  (Shubman Gill) 2023 मध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकेल का? शुभमन आपल्या सिनियर विराट कोहलीचा हा विक्रम मोडेल का? भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिका सुरू होताच हे प्रश्न सर्वाधिक विचारले जाणार आहेत.

आणि असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर, फक्त शुभमन गिलच का. इतर कोणी का नाही? तर त्याचे थेट उत्तर असे आहे की शुभमन गिल हा २०२३ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. मात्र शतकांच्या बाबतीत तो विराट कोहलीच्या मागे आहे.

IND vs NED: विश्वचषकात भारताच्या टॉप 4 खेळाडूंनी रचला इतिहास, प्रथमच भारतीय संघातील खेळाडूंनी केली अशी कामगिरी..

Mitchell johnson – Devid Warner Controversy: मिचेलल जॉन्सनच्या वादग्रस्त विधानावर पहिल्यांदाच बोलला डेव्हिड वॉर्नर, “म्हणाला, हे तर”

शुभमन गिल आणि विराट कोहलीसाठी 2023 ठरले गोल्डन इयर.

शुभमन गिल आणि विराट कोहली या दोघांसाठी 2023 हे वर्ष खूप चांगले राहिले. विराट कोहलीने यावर्षी एकूण 8 शतके झळकावली आहेत, जी जगातील इतर फलंदाजांपेक्षा जास्त आहेत. सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत शुभमन गिल (७) दुसऱ्या स्थानावर आहे. विराट आणि शुभमन गिलमध्ये केवळ एका शतकाचे अंतर आहे.

म्हणजेच शुभमन गिलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यात किंवा 3 वनडे मालिकेत शतक झळकावले तर तो विराट कोहलीच्या बरोबरीचा असेल. या 6 सामन्यात शुभमनने 2 शतके ठोकली तर तो विराटला मागे सोडेल.

एकदिवसीय डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 किंवा एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही, हे क्रिकेटप्रेमींना माहीत आहे. कोहली थेट कसोटी मालिकेत सामील होईल, जिथे शुभमनही त्याच्यासोबत असेल. म्हणजेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शुभमन गिल विराटपेक्षा 6 अधिक सामने खेळेल अशी शक्यता आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शुभमन गिलला खास विक्रम करण्याची संधी, विराट कोहलीला सोडू शकतो मागे..

विराट कोहली आणि शुबमन गिलनंतर डॅरिल मिशेल 2023 मध्ये अधिक शतके झळकावणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने या वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये 6 शतके झळकावली आहेत. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतो आणि न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे प्रत्येकी 5 शतकांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये 12 शतके झळकावली होती.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *