शुभमन गिल वर संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होण्याचे संकट, असं झाल्यास अजित आगरकर या 2 खेळाडूपैकी एकाला देऊ शकतो संधी..!
शुभमन गिल: टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) डेंग्यूमुळे संपूर्ण विश्वचषकातून बाहेर पडू शकतो आणि असे झाल्यास टीम इंडियासाठी हा एक मोठा धक्का असेल. कारण शुभमन गेल्या काही एकदिवशीय सामन्यापासून खूप फोर्ममध्ये होता. त्याने ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये सर्वांत जास्त धावा काढल्या होत्या. अश्या स्थितीमध्ये जर शुभमन गिल संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर पडला तर भारतीय संघासाठी त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडणे सोपे असणार नाही.
यावेळी BCCI द्वारे विश्वचषक आयोजित केला जात असल्याने, टीम इंडिया घरच्या भूमीवर ट्रॉफी जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. मात्र, शुभमन गिल स्पर्धेतून बाहेर आहे की नाही याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. बातमी अशीही समोर येत आहे की, शुभमनला आता डेंगूमुळे चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
आता अशीही चर्चा सुरु झाली आहे की, जर शुभमन गिल गिल विश्वचषक 2023 स्पर्धेमधून बाहेर पडला तर त्याच्या जागी निवडकर्ते कोणाला संघात संधी देतील.
बीसीसीआयचे निवडकर्ते अजित आगरकर यांनी शुभमन गिलच्या बदलीचा विचार सुरू केला असून त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मालाही दोन खेळाडूची नावेही सुचवले आहेत.आता शुभमन गिलच्या जागी संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूला संधी देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात कोणाला संधी मिळू शकेल?
विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी दोन खेळाडूंची नावे दिले आहेत आणि हे दोन खेळाडू म्हणजे ‘ऋतुराज गायकवाड’ आणि ‘यशस्वी जैस्वाल’. हे दोन्ही खेळाडू अतिशय प्रतिभावान आहेत आणि नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र या दोन खेळाडूंपैकी कोणाची निवड होणार हे कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर अवलंबून आहे.
पण आगरकरने सुचवलेल्या खेळाडूंच्या नावांची विश्वचषक संघ निवडीच्या वेळी बरीच चर्चा झाली आणि या दोन खेळाडूंपैकी किमान एकाला तरी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.या दोघांपैकी कोणाला संधी द्यायचा हा निर्णय शुभमन गिलच्या तब्येतीवर अवलंबून आहे. जर येत्या 2/3 दिवसात शुभमन ठीक होऊन परतला तर मात्र या दोघानाही घरीच बसावे लागू शकते.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या पाठिंब्याबद्दल बोलायचे झाले तर, युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालला त्याची साथ मिळू शकते. यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत, एकीकडे यशस्वी जैस्वाल हा डावखुरा फलंदाज आहे आणि दुसरीकडे त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत याआधी फलंदाजी केली आहे आणि दीर्घ भागीदारी केली आहे. अशा परिस्थितीत दोघांनाही एकमेकांची खेळण्याची पद्धत चांगलीच माहिती आहे.
म्हणूनच जर शुभमन गिल संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर गेला तर, त्याच्या जागी टीम इंडियामध्ये यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आता नक्की काय होते ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. भारतीय संघाचा विश्वचषक 2023 मधील दुसरा सामना उद्या अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. याआधी संघाने ऑस्ट्रोलियाचा पराभव करत विजयी सुरवात केली आहे.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..