6,2,4,6,6,6.. शुभमन गिलने रचला इतिहास.. एकदिवशीय सामन्यात द्विशतक ठोकणारा ठरला सर्वांत तरुण खेळाडू, सोबतच मोडले हे मोठे विक्रम..

6,2,4,6,6,6.. शुभमन गिलने रचला इतिहास.. एकदिवशीय सामन्यात द्विशतक ठोकणारा ठरला सर्वांत तरुण खेळाडू, सोबतच मोडले हे मोठे विक्रम..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणि सलामीवर शुभमन गिल याने तुफानी फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले आहे.सलामीला फलंदाजीस आलेला शुभमन गिलने तब्बल 50 षटके फलंदाजी केली. त्यात त्याने 208 धावा काढल्या. यासाठी त्याला 149 चेंडूंचा सामना करावा लागला आहे. शुभमनच्या या दुहेरी शतकामुळे भारतीय संघ चांगल्या धावसंखेपर्यंत पोहचू शकला.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 349 धावा केल्या आणी न्यूझीलंड समोर विजयासाठी 350 धावांचे लक्ष मिळाले. आता भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
शुभमनने आपल्या खेळीत बनवले अनेक विक्रम..
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकावून शुभमन गिलने नवा इतिहास रचला आहे. त्याने आपल्या या खेळीत अनेक विक्रम मोडले आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर..
१. 50 षटके फलंदाजी करणारा सर्वांत तरुण खेळाडू बनला शुभमन गिल.
2. एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकावणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला गिल.
𝟔.𝟔.𝟔.
𝐃𝐎𝐔𝐁𝐋𝐄 𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐘 😱🤩😱
Take a bow, @ShubmanGill 💯💯#INDvNZ pic.twitter.com/wwvQslGTxb
— BCCI (@BCCI) January 18, 2023
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी/डब्ल्यूके), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (क), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
Indian players only hit double century
Shubhman Gill knock today#208 runs on 149 balls pic.twitter.com/Immvejan1g
— Jyotiraditya (@Yash231728) January 18, 2023
IND vs NZ ODI मध्ये हेड टू हेड: भारत आणि न्यूझीलंडमध्ये कोणाचे वर्चस्व आहे?
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ ११३ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने 55 सामने जिंकले आहेत तर किवी संघाने 50 वनडेमध्ये भारताचा पराभव केला आहे. सात सामने अनिर्णित राहिले तर एक सामना बरोबरीत राहिला. भारताने घरच्या मैदानावर २६ तर न्यूझीलंडनेही २६ वनडे जिंकल्या आहेत. टीम इंडियाने या काळात घराबाहेर 14 वनडे जिंकले आहेत. भारताने तटस्थ ठिकाणी 15 एकदिवसीय सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडच्या खात्यात 16 विजय आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका टीव्हीवर थेट कशी पाहायची?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका डीडी स्पोर्ट्स फ्री टू एअर चॅनलवर विनामूल्य पाहता येईल. याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही हा सामना उपलब्ध असेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सामने चाहत्यांना मोबाईलवर कसे पाहता येतील?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे सामने डीडी स्पोर्ट्सच्या मोबाईल अॅपवर पाहता येतील. याशिवाय हा सामना डिस्ने हॉट स्टारवरही उपलब्ध असेल.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…