शुभमन गिल : भारताचा युवा सलामवीर फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) याला ऐन विश्वचषकाच्या तोंडावर डेंग्यूची लागण झाली होती. म्हणून तो विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. विश्वशषकातील (Worldcup 2023) भारताचा पुढचा सामना 14 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यात गिल खेळणार की नाही? याविषयी क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. महत्वाच म्हणजे 2023 चा विश्वचषक हा त्याचा पहिलाच विश्वचषक आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिलच्या प्रकृतीमध्ये वारंवार सुधारणा होत असून तो लवकरच अहमदाबाद येथे दाखल होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही याबाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मागील आठवड्यात गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स 70 हजार पेक्षा कमी झाले असल्याने त्याच्यावर चेन्नई येथे उपचार सुरू होते. 24 तासाच्या उपचारानंतर त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आले.
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघगिल विना सामना खेळत होता. पहिल्या दोन्ही सामन्यात गिलच्या ऐवजी युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला संधी मिळाली होती. शुभमन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार असल्याची माहिती आता पुढे येत आहे. हा भारतीय संघाला मोठा धक्का असू शकतो. डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला शरीरात बरेच दिवस कमजोरी येत असते. त्यामुळे शुभमनला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळवून भारतीय संघ कोणताही धोका घेऊ शकत नाही. 19 ऑक्टोंबर रोजी पुणे येथे बांगलादेश विरुद्ध तो खेळताना दिसू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, शुभमन ने केली सरावाला सुरवात.
बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे की, शुभमन आता पूर्णपणे बरा झाला असून त्याने सरावाला देखील सुरवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्याने सराव सत्रात भाग घेतला. तरीही खबरदारी म्हणून त्याला इतर खेळाडू पासून अजूनही लांब ठेवण्यात आले आहे. शुभमनची फिटनेस टेस्ट होईल आणि त्यानंतर तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार का नाही, हे ठरवले जाईल. पाकिस्तान विरुद्ध भारत हा महामुकाबला येत्या शनिवारी म्हणजेच (14 ऑक्टोबरला) खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा: