VIRAL VIDEO: शुभमन गिलने लॉकी फर्ग्युसनला धु-धु धुतला.. मारले एवढे जबरदस्त षटकार की, लोक लागले स्टेडियममध्येचं नाचायला.. व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावून सर्वांची मने जिंकली आहेत. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात गिलने २०८ धावा केल्या. त्याने 145 चेंडूत एका षटकारासह आपले द्विशतक पूर्ण केले. गिलने आज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि 19 चौकारांसह 9 षटकार ठोकले.
I will tell my grandkids one day –
I was present when @ShubmanGill made a freaking Double Hundred!!! 😍#INDvNZ #ShubmanGill pic.twitter.com/SZMuVnqlfe
— Afzal Jiwani (@jiwani_afzal) January 18, 2023
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात गिलने केले हे विक्रम..
शुभमन गिलने अल्पावधीतच टीम इंडियात आपला ठसा उमटवला आहे. त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले. यासह गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू बनला आहे, तर द्विशतक करणारा तो आता पाचवा भारतीय बनला आहे.
गिलने लॉकी फर्ग्युसनला सलग 3 षटकार ठोकले.
गिलच्या २०८ धावांच्या खेळीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या षटकात त्याने सलग तीन षटकार ठोकले. एवढेच नाही तर गिलने इतर गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि मैदानाच्या चारही बाजूंनी धावा केल्या. व्हिडिओ पहा…
Shubman Gill 🔥 What a way to smash a double ton.#ShubmanGill #INDvsNZpic.twitter.com/SVk3ZS5Zd6
— DRINK CRICKET (@Drink_Cricket) January 18, 2023
टीम इंडियाने 249 धावा केल्या.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 8 विकेट गमावून 349 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 34, शुभमन गिलने 208, सूर्यकुमार यादवने 31, हार्दिक पंड्याने 28 धावांचे योगदान दिले. आता न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 50 षटकांत 350 धावा करायच्या आहेत.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…