रोहित शर्मा- विराट कोहली नाही तर हा खेळाडू मोडेल ‘ब्रायन लारा’चा 400 धावांचा विक्रम, स्वतः लाराने केली मोठी भविष्यवाणी..

रोहित शर्मा- विराट कोहली नाही तर हा खेळाडू मोडेल 'ब्रायन लारा'चा 400 धावांचा विक्रम, स्वतः लाराने केली मोठी भविष्यवाणी..

 

ब्रायन लारा : टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेसोबत तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आपल्या पुढील मोहिमेला १० डिसेंबरपासून सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. ज्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. या दौऱ्यावर सर्वांच्या नजरा कसोटी मालिकेकडे लागल्या आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीही कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. पण वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा याने शुभमन गिलबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. ब्रायन लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आहे, जो आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही. पण आता लाराला आशा आहे की शुभमन गिल हा पराक्रम करू शकेल.

रोहित शर्मा- विराट कोहली नाही तर हा खेळाडू मोडेल 'ब्रायन लारा'चा 400 धावांचा विक्रम, स्वतः लाराने केली मोठी भविष्यवाणी..

गिल लाराचा खास विक्रम मोडेल.

खरे तर क्रिकेटमध्ये रोजच विक्रम होत राहतात. पण असे काही विक्रम आहेत जे मोडणे खूप कठीण आहे. ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम त्यापैकीच एक आहे. ब्रायन लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या एका डावात 400 धावा करण्याचा विशेष विक्रम आहे, याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात 501 नाबाद धावा करण्याचा विक्रमही ब्रायन लाराच्या नावावर आहे.

ज्याबाबत आता स्वत: ब्रायन लाराने काहीतरी मोठे वक्तव्य केले आहे. ब्रायन लारा म्हणाला, शुभमन गिल हा आजच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि मला आशा आहे की तो त्याचे दोन्ही विक्रम मोडू शकेल. आगामी काळात गिल अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करेल आणि क्रिकेटवर राज्य करेल.

रोहित शर्मा- विराट कोहली नाही तर हा खेळाडू मोडेल 'ब्रायन लारा'चा 400 धावांचा विक्रम, स्वतः लाराने केली मोठी भविष्यवाणी..

गिल जबरदस्त फॉर्मात आहे.

शुबमन गिलचा देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी मालिकेत समावेश करण्यात आला आहे. गिलचा अलीकडचा फॉर्मही चांगलाच आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने अप्रतिम फलंदाजी केली. आता या दौऱ्यातही टीम इंडिया त्याच्याकडून अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा करेल. गिलने टीम इंडियासाठी 18 कसोटी, 44 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत.

त्याने कसोटीत 966 धावा, एकदिवसीय सामन्यात 2271 धावा आणि T20 मध्ये 304 धावा केल्या आहेत. गिलने न्यूझीलंडविरुद्ध झळकावलेले एकदिवसीय सामन्यातही त्याच्या नावावर द्विशतक आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *