विराट-सचिन-बाबर आझम सारख्या दिग्गजांना मागे सोडत टीम शुभमन गिलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..!
टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल यावर्षी खूप धावा करत आहे. प्रत्येक सामन्यात गिल अनेक मोठे रेकॉर्ड बनवत आहे आणि मोडत आहे.इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावून आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यावेळी गिलने सचिन तेंडुलकर, हाशिम आमला, विराट कोहली आणि बाबर आझम यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.

इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने 97 चेंडूत 104 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 4 षटकार आले. गिलचे वनडेतील हे सहावे शतक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच शतक झळकावले आहे.
गिल एकदिवसीय सामन्यांच्या 35 डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात शुबमन गिल 35 डावात 1900 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या विक्रमांच्या यादीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, पाकिस्तानचा बाबर आझम, फखर जमान आणि विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे.

वनडेच्या 35 डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ..
- शुभमन गिल- 1917 धावा
- हाशिम आमला- 1844 धावा
- बाबर आझम- 1758 धावा
- रॅसी व्हॅन डर डुसेन- १६७९ धावा
- फखर जमान- 1642 धावा
शुभमन गिलने ठोकले या वर्षातील पाचवे शतक!
शुभमन गिलचे यंदाचे पाचवे शतक आहे. एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा त्याहून अधिक शतके करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि शिखर धवन यांनी ही कामगिरी केली आहे. कोहलीने चार वेळा तर रोहितने तीन वेळा हा पराक्रम केला आहे. तर सचिन तेंडुलकर हे फक्त दोनदा करू शकला होता.
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..