Uncategorized

IND vs AUS LIVE: “हा तर केएल राहुलचा गुरु निघाला” दुसऱ्या डावातही 5 धावा काढून बाद झाल्याने शुभमन गिल होतोय ट्रोल, सोशल मिडीयावर लोकांनी केले भन्नाट मिम्स शेअर..

“हा तर केएल राहुलचा गुरु निघाला” दुसऱ्या डावातही 5 धावा काढून बाद झाल्याने शुभमन गिल होतोय ट्रोल, सोशल मिडीयावर लोकांनी केले भन्नाट मिम्स शेअर..


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. या ट्रॉफीचा हा 16वा हंगाम 10व्यांदा भारतीय भूमीवर खेळला जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 54 षटकांत 4 गडी गमावून 156 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडिया 33.2 षटकात अवघ्या 109 धावांवर आटोपली. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक २२ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनमनने सर्वाधिक ५ बळी घेतले. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ 76.3 षटकात 197 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 88 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 60 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला.

सलामीवीर शुभमन गिल ५ धावा करून नॅथन लायनचा बळी ठरला.

दुसऱ्या डावातही शुभमन अगदीच स्वस्तात बाद झाल्याने चाहते आता शुभमनवर चांगलेच भडकले आहेत. लोकांनी मिम्स शेअर करत आपला राग दर्शवला आहे तर दुसरीकडे सोशल मिडीयावर शुभमनची मस्करी उडवणारे ट्वीट सुद्धा व्हायरल होत आहे. पाहूया काही भन्नाट मिम्स..


हे ही वाचा..

रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..

उद्यापासून सुरु होतेय भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील तिसरा कसोटी, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू, तर हे खेळाडू करू शकतात तुम्हाला मालामाल..

आयपीएल 2023 साठी जसप्रीत बूमराहच्या जागी मुंबई इंडियन्स ‘या’ 3 गोलंदाजाना देऊ शकते संधी, एकजण तर आहे अत्यंत घातक गोलंदाज..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button