Shubman Gill Health Update: सेमिफायनल मध्ये रिटायर्ड हर्ट झालेला शुभमन गिल फायनल सामन्यात खेळणार? बीसीसीआयने शेअर केली मोठी अपडेट…

Shubman Gill Health Update: सेमिफायनल मध्ये रिटायर्ड हर्ट झालेला शुभमन गिल फायनल सामन्यात खेळणार? बीसीसीआयने शेअर केली मोठी अपडेट...

 

Shubman Gill Health Update: ICC विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी देशभरातील चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत, पण या सामन्यापूर्वी भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना खेळणार का हा मोठा प्रश्न उरतो?

IND vs NZ : गिलने 80 धावांची खेळी खेळली होती.

Ind vs Eng: भारताचा विश्वचषकात विजयी षटकार; इंग्लंड विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

शुभमन गिल (Shubman Gill) या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गिलने उपांत्य फेरीच्या सामन्यातही ८० धावांची नाबाद खेळी खेळली होती. या सामन्यादरम्यान शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. गिल मैदानावर खूप धावा करत होता, पण पायात दुखापत झाल्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हाव लागलं.. शुभमन गिल मैदानाबाहेर गेला होता. यावेळी, गिल 76 धावांवर खेळत असताना त्याच्या पायात क्रॅम्प आला. पायात दुखापत नसती तर किवी संघाविरुद्ध तो शतक झळकावू शकला असता. अखेरच्या षटकात गिल पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला, पण यादरम्यान गिलच्या बॅटमधून केवळ चार धावा झाल्या.

गिल फायनल खेळू शकेल का?

सूर्यकुमार यादवची विकेट पडल्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. गिलला पाहून चाहत्यांना आनंद झाला की आता त्याच्या बॅटमधून चौकारांचा पाऊस पडेल, पण गिलच्या बॅटमधून एकही चौकार लागला नाही. अशा परिस्थितीत गिल तंदुरुस्त नाही की काय अशी भीती चाहत्यांना लागली आहे.

Shubman Gill Health Update: सेमिफायनल मध्ये रिटायर्ड हर्ट झालेला शुभमन गिल फायनल सामन्यात खेळणार? बीसीसीआयने शेअर केली मोठी अपडेट...

आत्तापर्यंत रोहित शर्मा किंवा बीसीसीआयकडून गिलबाबत कोणतीही अपडेट आलेली नसली तरी, गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. फायनलपर्यंत मी बरा राहीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेन, असेही गिलने काल  पत्रकार परिषदेत सांगितले होते. यावरून गिल अंतिम फेरीत खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा: